‘अग्गबाई सासूबाई’ मालिका महत्वाच्या वळणावर, सोहम मनापासून मागणार आईची माफी?
'अग्गबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मालिकेला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.
मुंबई :‘अग्गबाई सासूबाई‘ (Aggabai Sasubai) मालिकेला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. अभिजित सगळी प्रॉपर्टी सोहम च्या नावाने करून अभिजित आणि आसावरी घर सोडून निघून जातात.(Aggabai Sasubai series at a turning)
आपला एक वेगळा संसार थाटतात, शुभ्रा ही त्यांना सोहमच्या नकळत मदत करत असते. पण आता जसजशी मालिका पुढे जातेय मालिकेत खूप घडामोडी घडणार आहेत, पण आता ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे.
प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण त्यांना लवकरच अनुभवता येणार आहे कारण त्यांचा आवडता बबड्या आता सुधारणार आहे. कूकिंग स्पर्धेनंतर आसावरीने केलेल्या भाषणातून सोहम ला खूप भरून येत त्याच्या डोळ्यात पाणी येत, आपण कुठेतरी चुकलो याची त्याला जाणीव देखील होते आणि तो मनापासून आई ची माफी मागतो, पण सोहमवर चिडलेली आसावरी सोहमला माफ करणार का? सोहमला त्याने केलेल्या चुकांची उपरती होणार का? आणि पुन्हा अभिजित – आसावरी परत आपल्या घरी जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता कमावली. जितकी आसावरी आणि अभिजीतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, तितकीच शुभ्राही प्रभावी ठरली. जसा सोहम म्हणजे बबड्याचा घरोघरी बोटं मोडून तिटकारा व्यक्त केला जातो, तसेच बबड्याचे आजोबाही अनेकांना आपलेसे वाटत. दिग्गज अभिनेते रवी पटवर्धन यांनी साकारलेली करारी, खमक्या आजोबांची भूमिका काही एपिसोड्समध्येच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. मात्र त्याचे अचानक झालेले निधन यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
बबड्या-शुभ्रापेक्षाही लोकप्रिय व्यक्तिरेखा सोशल मीडियावर बबड्याच्या आजोबांसाठी अनेक मेसेज येत असल्याचं आपण पाहिलं आहे. अगदी तेजश्री प्रधान-आशुतोष पत्की यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही आजोबांची आठवण काढली जात असे. आजोबांचं फॅन फॉलोइंग इतकं जबरदस्त होतं, की तेजश्रीने इन्स्टा स्टोरीमधून रवी पटवर्धन यांच्यासोबत फोटो शेअर करत आम्हालाही तुमची आठवण येते, सर्व काही सुरळीत झाल्यावर तुम्ही सेटवर परत येण्याची वाट पाहतोय, असं सांगावंसं वाटलं.
संबंधित बातम्या :
Aggabai Sasubai | ‘बबड्या’चे सगळेच डाव ‘निष्फळ’ ठरणार, आसावरी-अभिजीतला शुभ्रा पुन्हा एकत्र आणणार?
(Aggabai Sasubai series at a turning)