AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे.

Sushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!
खरंतर, सुशांतच्या आत्महत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या करण्यात आली यावर मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला. सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आली असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 1:43 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा (Viscera) रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषकण आढळले नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. सुशांतचा व्हिसेरा (Viscera) रिपोर्ट AIIMSकडून सोमवारी (28 सप्टेंबर) सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला (AIIMS submitted Sushant Singh Rajput Viscera report to CBI).

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने, त्याच्यावर विषप्रयोग केला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या तपासाकरिता AIIMSच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. याच विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट सादर केला आहे.

कूपर रुग्णालयाला क्लीनचीट नाही

एम्सच्या या रिपोर्टमध्ये आणि सीबीआयच्या तपासणीत तफावत आढळली नाही. मात्र, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांना अद्याप पूर्ण क्लीन चिट देण्यात आलेली नाही. कूपर रुग्णालयाच्या अहवालाची आणखी सविस्तरपणे तपासणी होणार असल्याचे सांगितले जाते आहे. कूपर रुग्णालय अजूनही प्रश्नांच्या घेऱ्यात अडकले आहे.

एम्सच्या अहवालानुसार, सुशांत प्रकरणात कूपर रुग्णालयाने निष्काळजीपणा केला आहे. सुशांत सिंह राजपूतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. ज्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. कूपर रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात, सुशांतच्या गळ्यावरील खुणांबाबत काहीही नमूद केलेले नसून, सुशांतच्या मृत्यूची वेळही नमूद केलेली नव्हती (AIIMS submitted Sushant Singh Rajput Viscera report to CBI).

सुशांतच्या कुटुंबियांचे आरोप

सुशांतच्या कुटुंबाच्यावतीने त्याच्या कौटुंबिक वकिलाने मृत्यूच्या आधी सुशांतवर विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु, आता एम्सच्या रिपोर्टमधून सुशांतला कोणत्याही प्रकारचे विष दिले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या कुटुंबाने, सुशांतच्या आत्महत्येस हत्या असल्याचे म्हटले आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आपल्या मुलाचा विष देऊन मारल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी रियाचे नाव पुढे आल्याने, ती चौकशीच्या घेऱ्यात अडकली आहे. ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तीनही संस्थांकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगलमध्येही रियाचे नाव आल्याने एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली. गेल्या 22 दिवसांपासून रिया भायखळा तुरुंगात बंद आहे. तिचा जामीन अर्ज न्यायालयाने दोनवेळा फेटाळला आहे.

दरम्यान, फॉरेन्सिक टीम आणि सीबीआयच्या दोन बैठका झाल्या आहेत. परंतु, या बैठका अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेल्या नाहीत. सीबीआय लवकरच सुशांतच्या कुटुंबाचीदेखील चौकशी करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, अद्याप त्याच्या कुटुंबाला कोणताही समन्स बजावण्यात आलेला नाही.

(AIIMS submitted Sushant Singh Rajput Viscera report to CBI)

संबंधित बातम्या : 

सुशांतसिंह राजपूत जिवंत असता, तर तुरुंगात असता का? : तापसी पन्नू

Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

ड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.