ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्यामध्ये दुरावा, घटस्फोट झाल्यास अभिनेत्रीला किती मिळेल पोटगी?
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला? घटस्फोट झाल्यास अभिनेत्रीला दर महिन्याला पोटगी म्हणून मिळेल इतकी रक्कम? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या नात्याची चर्चा...
मुंबई | 18 डिसेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय – अभिनेता अभिषेक बच्चन यांना एकत्र स्पॉट करण्यात येत आहे. पण सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगल्या आहे. नुकताच झालेल्या आराध्या हिच्या एनुअल डे कार्यक्रमात अभिषेक – ऐश्वर्या वेगळ्या कारमधून आले. पण आराध्या हिला घेऊन घरी परतत असताना मात्र ऐश्वर्या – अभिषेक लेकीसोबत एकत्र गेले. अशा अनेक गोष्टी चाहत्यांच्या समोर आल्या आहेत, ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांना उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक बच्चन याच्या मालमत्तेची माहिती व्हायरल होत आहे. दोघांचा घटस्फोट झाला तर ऐश्वर्या राय हिला किती पोटगी मिळेल? याची देखील चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन याची एकूण संपत्ती 280 कोटी रुपये आहे. अभिनेता दर महिन्याला तब्बल 1.8 कोटी रुपये कमावत असल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याचं वार्षिक उत्पन्न 25 कोटी रुपये आहे.. असं देखील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अभिषेक याच्याकडे 75 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी आणि इतर 60 कोटी रुपयांची संपत्ती आहे. म्हणजे रिपोर्टनुसार घटस्फोट झाल्यास अभिषेक याला पत्नी ऐश्वर्या हिला दर महिन्याला जवळपास 45 कोटी रुपये द्यावे लागतील… अशी देखील चर्चा रंगत आहे.
अभिषेक बच्चन याच्याबद्दल सांगयचं झालं तर, अभिनेता बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध व्यक्ती आहे. बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबात अभिषेक याचा जन्म झाल्यामुळे अभिषेक कायम लाईमलाईटमध्ये असतो. अभिषेक फक्त सिनेमांमधून नाही तर, इतर मार्गांनी देखील गंडगंज पैसा कमावतो. अभिषेक याचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 मध्ये झाला होता.
अभिषेक याने आई – वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना अभिनेत्याने 2007 मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये अभिनेत्रीने लेक आराध्या हिला जन्म दिला. लेकीमुळेच दोघे अद्याप एकत्र आहेत अशी देखील चर्चा रंगत आहे.
सांगायचं झालं तर, बच्चन कुटुंबात अनेक चढ-उतार असतील पण कुटुंबातील वाद कधीही बाहेर आलेले नाहीत. पण आता अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर बच्चन कुटुंबिय आणि अभिषेक – ऐश्वर्या कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.