ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, आई ऐश्वर्याने…
ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असणारी एक अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ऐश्वर्या राय दिसते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी झाले. या लग्नाला देशातूनच नाहीतर विदेशातूनही लोक पोहोचले. या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. प्रत्येक क्षेत्रातील नामवंत लोक या लग्न सोहळ्यात हजर होते. देशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आशिर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकार तर या लग्नात धमाल करतानाच दिसले. हार्दिक पांड्या यानेही अनंत अंबानीच्या लग्नात धमाकेदार डान्स केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत शुभ आशिर्वाद सेरेमनीमध्ये पोहोचली होती. आता ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मुळात म्हणजे आराध्या बच्चन हिची नवीन हेअरस्टाईल लोकांना चांगलीच आवडल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी आराध्या बच्चन हिच्या या नव्या लूकचे काैतुकही केले आहे.
ऐश्वर्या राय हिच्यासोबत फोटोसाठी खास पोझ देताना आराध्या बच्चन ही दिसली. मात्र, यावेळी तिचे केस सतत पुढे येताना दिसले. तिला केसांमुळे त्रास होत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते. यावेळी सतत केस मागे घेताना आराध्या ही दिसली. मात्र, तिचे केस सतत पुढे येत होते. हे पाहून मुलीचे केस व्यवस्थित करताना ऐश्वर्या राय ही दिसली.
View this post on Instagram
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, ऐश्वर्या राय प्रेमाने आराध्याचे केस मागे घेत आहे. विशेष म्हणजे यावेळी खास सुंदर अशा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आराध्या पोहोचली होती. आराध्या हिचा या लूकमध्ये जबरदस्त असा दिसत होता. चाहते या व्हिडीओ आणि फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसत आहे. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचेही सांगितले जातंय. मात्र, यावर ऐश्वर्या राय हिने कधीच भाष्य केले नाहीये. फक्त ऐश्वर्या राय हिच नाहीतर बच्चन कुटुंबियांपैकीही कोणीही यावर भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याचेही सांगितले जातंय.