लेकीसोबत परदेशात शिफ्ट होणार ऐश्वर्या राय? सोडणार ‘बच्चन’ कुटुंबियांचं घर, कारण अखेर समोर

Aishwarya Abhishek on Aaradhya Bachchan : यंदाची होळी ऐश्वर्या रायने का केली 'बच्चन' कुटुंबियांसोबत साजरी? लेकीसोबत अभिनेत्री सोडणार सासर? अखेर कारण आलं समोर... ऐश्वर्या राय हिने का घेतला एवढा मोठा निर्णय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा...

लेकीसोबत परदेशात शिफ्ट होणार ऐश्वर्या राय? सोडणार 'बच्चन' कुटुंबियांचं घर, कारण अखेर समोर
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 12:28 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल देखील अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहेत. अशात अनेकदा ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसले, ज्यामुळे रंगणाऱ्या चर्चांवर पूर्णविराम लागला… पण आता ऐश्वर्या – अभिषेक त्यांच्या नात्यामुळे नाहीतर, लेक आराध्या बच्चन हिच्यामुळे चर्चेत आले आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत परदेशात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या बच्चन हिची चर्चा रंगली आहे.

अभिषेक – ऐश्वर्या लेक आराध्यासोबत परदेशात होणार शिफ्ट?

रिपोर्टनुसार, अभिषेक – ऐश्वर्या यांनी लेक आराध्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आराध्या बच्चन पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. पुढच्या शिक्षणासाठी आराध्या लंडन किंवा न्यूयॉर्क याठिकाणी जाऊ शकते. असं सांगण्यात येत आहे. सध्या आराध्या धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे. 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात जाईल.. असं सांगण्यात येत आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऐश्वर्या हिने यंदाच्या वर्षी होळी पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी अभिनेत्रीने आराध्या हिच्या मित्रमंडळींना मोठ्या संख्येने बोलावलं होतं. पुढच्या वर्षी आराध्या परदेशात शिक्षणासाठी जाईल म्हणून अभिनेत्रीने लेकीची यंदाची होळी खास करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या सर्वत्र ऐश्वर्या, अभिषेक, आराध्या यांची चर्चा रंगली आहे.

किती वर्षांची आहे आराध्या बच्चन?

20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने 16 नोव्हेंबर 2011 मध्ये आराध्या हिला जन्म दिला. यावर्षी आराध्या स्वतःचा 13 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आराध्या बच्चन कुटुंबात सर्वांची लाडकी आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची देखील आराध्या प्रचंड लाडकी आहे. बिग बी कायम नात आराध्या हिच्याबद्दल बोलताना दिसतात. आराध्या हिच्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये देखील अमिताभ बच्चन हजेरी लावत असतात.

आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत आराध्या अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनंत अंबानी – राधिता मर्चंट यांच्या प्रि-वेडिंग सेलिब्रेशन सोहळ्यात सर्वांच्या नजरा आराध्या हिच्यावर येऊन थांबल्या. आराध्या हिच्या हटके लूकच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.