लेकीच्या शाळेत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा धमाकेदार डान्स; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान व्हिडीओ व्हायरल
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अलीकडेच जोरदार रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळणार असं दिसत आहे. कारण या व्हिडाओमध्ये अभिषेक पत्नी ऐश्वर्यासोबत मस्त डान्स करताना दिसत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन लवकरच घटस्फोट घेणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. अनेकदा ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत एकटीच दिसली. पण आता या सर्व चर्चांवर आता पडदा पडणार असं दिसून येत आहे. कारण या पती-पत्नीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामुळे आता चाहत्यांचा संभ्रम दूर होणार असं दिसत आहे.
घटस्फोटांच्या चर्चांना मिळणार पूर्णविराम
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आता काही नवीन नाहीत. बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्या कौटुंबिक वादाबद्दल आणि त्याच्या घटस्फोटाबद्दल बऱ्याच आणि वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. पण काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे असे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असं दिसत आहे.
या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान लेक आराध्याच्या शाळेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा डान्स पाहायला मिळत आहे. शाळेतील मुलांसोबत ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे डान्स करत आहेत.
King @iamsrk grooving on “Deewangi Deewangi” song!! pic.twitter.com/a63x3AhDzm
— Nidhi (@SrkianNidhiii) December 19, 2024
लेकीच्या शाळेतील कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकचा धमाकेदार डान्स
दरवर्षीप्रमाणे यंदाही नुकताच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले होते. आराध्याची अॅक्टींग पाहायला ऐश्वर्या, अभिषेक तसेच अमिताभ बच्चनसुद्धा पोहोचले होते.
याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून अभिषेक, ऐश्वर्या दीवानगी गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर शाहरुख खान, सुहाना खान, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच सेलिब्रिटीही शाळेतील मुलांसोबत डान्स करताना दिसत आहेत.
अभिषेक- ऐश्वर्याच्या व्हिडीओला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद
या फंक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कार्यक्रमाला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायसोबत आजोबा आजोबा अमिताभ बच्चनही पोहोचले होते. हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच चाहत्यांनी देखील त्यांच्या व्हिडीओ आणि फोटोंवर कमेंटस् केल्या आहेत.