ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचा होतोय घटस्फोट? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Aishwarya Rai : लेक 12 वर्षांची झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने घेतला मोठा निर्णय? अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ... नक्की काय आहे ऐश्वर्या अभिषेक यांच्या नात्यातील सत्य.. दोघांच्या घटस्फोटाच्या रंगत आहेत चर्चा...

ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा होतोय घटस्फोट? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 9:28 AM

मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये फार ठराविक लोकांच्या उपस्थितीत अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न झालं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या हिला जन्म दिला. ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. एवढंच नाही तर, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. ऐश्वर्या – अभिषेक विभक्त होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, ऐश्वर्या हिने केलेल्या एका पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच ऐश्वर्या हिने दिवगंत वडील कृष्णराज राय यांच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो पोस्ट केले होते. ऐश्वर्या हिने वडीलांसोबत आराध्या हिचा एक फोटो पोस्ट केला होता. स्वतःचा वडिलांसोबत एक फोटो आणि वडिलांच्या फोटोसोबत फोटो पोस्ट केला होता. पण कोणत्याच फोटोमध्ये अभिषेक नव्हता..

हे सुद्धा वाचा

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘कायम तुमच्यावर प्रेम करत राहिल. सर्वात प्रेमळ वडील – अज्जा… दयाळू काळजी घेणारे… तुमच्या सारखं कोणीही नाही… वाढदिवसाच्या शुभेच्छा… तुमची खूप आठवण येते…’ असं लिहिलं..

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लेकीच्या वाढदिवासाच्या दिवशी देखील ऐश्वर्या हिने फक्त आराध्या हिच्यासोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तर अभिषेक याने देखील फक्त आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट केला. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि आराध्या यांना स्पॉट केलं जातं. अभिषेक दोघींसोबत नसतो…

सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या पोस्ट पाहाता दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. पोस्टवर एक चाहता म्हणाला, ‘ऐश्वर्या तू आराध्या आणि अभिषेक यांचे फोटो पोस्ट का नाही करत…’, ‘तुझ्या सोशल मीडियावर कुटुंबासोबत फार कमी फोटो आहेत…’ दरम्यान रंगणाऱ्या चर्चांवर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर कायम ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट होत असतात. ऐश्वर्या देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.