घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे ‘ते’ फोटो व्हायरल, मुलगी आराध्याही..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोन्ही नावे सध्या तूफान चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबद्दल बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल उलटसुलट चर्चा बघायला मिळत आहे. चर्चांनुसार यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसून लवकरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार. मध्यंतरी तर थेट सांगण्यात आल की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर देखील सोडले आहे. मात्र, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीच भाष्य हे केले नाहीये. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या सुरू असतानाच आता काही फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांमध्येही मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. विशेष बाब म्हणजे या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही देखील दिसत आहे.
व्हायरल होणारे हे फोटो विमानतळावरील आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन हे दिसत आहेत. हे तिघे कुठेतरी फिरायला जात असल्याचे बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कुटुंबासोबत धमाल करताना दिसत आहेत. तिघांचाही फोटोमध्ये जबरदस्त असा लूक बघायला मिळतोय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे मुलीसोबत विदेशात सुट्टीसाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये आराध्या बच्चन खास स्माईल देताना देखील दिसत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या या फोटोमुळे घटस्फोटाच्या चर्चा आता नक्कीच कमी होऊ शकतात. अभिषेकच्या वाढदिवसाच्या दिवशी खास पोस्ट ऐश्वर्याने शेअर केली होती.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नाते चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी चिंता ही बघायला मिळाली. हेच नाही तर खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार का हा प्रश्न विचारला जातोय.