ऐश्वर्या राय हिच्या खांद्यावर डोके ठेवून रडताना दिसली तारक मेहताची दयाबेन, ‘तो’ फोटो पाहून लोक हैराण…
ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियायवर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. ऐश्वर्या राय हिच्या हाताला काही दिवसांपूर्वीच दुखापत झाली.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या राय हिचे चित्रपट कायमच धमाल करताना दिसतात. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मोठ्या संपत्तीची मालकीनही ऐश्वर्या राय आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत अत्यंत शाही पद्धतीने लग्न केले. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमुळे मुख्य भूमिका केल्या आहेत. करिअरप्रमाणेच ऐश्वर्या राय हिचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये चक्क तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील दयाबेन अर्थात सर्वांची आवडती दिशा वकानी ही चक्क ऐश्वर्या राय हिच्या खांद्यावर डोके ठेऊन रडताना दिसतंय. हे फोटो पाहून लोक हैराण झाले. अनेकांना वाटले की, हा फोटो ऐश्वर्या राय हिच्या लग्नातीलच आहे.
सध्या दिशा वकानी आणि ऐश्वर्या राय यांचा व्हायरल होत असलेला हा फोटो जोधा अकबर चित्रपटातील आहे. या चित्रपटात दयाबेनने देखील काम केले होते. तो फोटो आता व्हायरल होताना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दिशा वकानी हिची प्रेक्षक तारक मेहता मालिकेत वाट पाहत आहेत. मात्र, दिशा वकानी कधी मालिकेत परत येणार याबद्दल काहीच अपडेट मिळत नाहीये.
ऐश्वर्या राय हिने ‘जोधा अकबर’ या चित्रपटात राणी जोधाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिच्या या भूमिकेचे जोरदार काैतुकही करण्यात आले. हा चित्रपट 2008 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळाले. या चित्रपटात अकबरच्या भूमिकेत अभिनेता ऋतिक रोशन हा दिसला. दोघांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला अनेक कलाकार सोडचिठ्ठी देत आहेत. दिशा वकानी हिने मालिका सोडली नसल्याचे सांगितले जातंय. दिशा वकानी सध्या आपल्या कुटुंबियांना वेळ देत आहे. असित कुमार मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, तुम्ही ज्याप्रमाणे दयाबेनची वाट पाहत आहात, तशीच वाट आम्ही देखील बघत आहोत. लवकरच दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करेल.