Love Life | ‘प्रत्येक महिन्यात वेगळ्या पुरुषासोबत…’, जेव्हा ऐश्वर्या हिने मनिषा कोईराला हिच्यावर साधला निशाणा

Love Life | ऐश्वर्या राय आणि मनिषा कोईराला यांचा एकाच पुरुषावर जडला होता जीव? 'त्या' घटनेनंतर ऐश्वर्या हिने मनिषा कोईराला हिच्यावर साधला निशाणा... सध्या सर्वत्र ऐश्वर्या - मनिषा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Love Life | 'प्रत्येक महिन्यात वेगळ्या पुरुषासोबत...',  जेव्हा ऐश्वर्या हिने मनिषा कोईराला हिच्यावर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 10:28 AM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. चाहते देखील आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री मनीषा कोईराला त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायच्या. ऐश्वर्या कधीच कोणत्याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देत नाही. ९० च्या दशकात ऐश्वर्याने तिच्या करियरची सुरुवात केली होती. मनीषा कोईराला हे नाव बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये लोकप्रिय होतं. जेव्हा एका मुलाखतीत ऐश्वर्याने हिने मनीषा हिच्यावर निशाणा साधला तेव्हा, दोघींच्या भांडणाबद्दल तुफान चर्चा रंगली.

मॉडलिंग दरम्यान, ऐश्वर्या राय हिचं नाव मॉडेल राजीव मूलचंजानी याच्यासोबत जोडण्यात आलं. राजीव याने मनीषा हिच्यासाठी ऐश्वर्या हिला सोडलं अशी बातमी समोर आली होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली, ‘१९९४ च्या सुरुवातीला एका मॅगझिनमध्ये याबद्दल लेख लिहिण्यात आला होता. राजीव याने मला सोडलं आहे.. अशा सर्वत्र अफवा पसरल्या होत्या… मला याबद्दल कळलं तेव्हा मी राजीव याला फोन केला आणि विचारलं हे सर्व काय सुरु आहे?’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘राजीव माझा खूप चांगला मित्र होता. तेव्हा मी त्याला खडसावलं आणि सांगितलं मला तुझ्या प्रेमकथे काहीही रस नाही. दोन महिन्यांनंतर रजीव आणि मनीषा विभक्त झाले. मनीषा प्रत्येक महिन्यात एका वेगळ्या पुरुषासोबत दिसायची… ‘

‘मिस वर्ल्ड असल्यामुळे मी जगभर फिरत होती. मुंबईत आल्यानंतर राजीव याचा मला फोन आला. मी त्याला म्हणाली, ‘बॉम्बे’ सिनेमात मनीषाने किती उत्तम काम केलं आहे. तिला शुभेच्छा देण्यासाठी भेटवस्तू पाठवण्याचा मी विचार करत आहे. तेव्हा राजीव हसला आणि मला म्हणाला तू न्यूजपेपर वाचला नाहीस का?’

अशात ऐश्वर्या हिना मनीषावर असलेला राग व्यक्त केला, ‘राजीवने मला सांगितलं की, मनीषा हिने दावा केला आहे,  तिला काही प्रेमपत्र मिळाले आहेत, जे राजीवने मझ्यासाठी लिहीले आहेत. यावर माझा विश्वास बसत नव्हता. सर्वत्र रंगणाऱ्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नव्हतं. जर दोघांचं ब्रेकअप काही महिन्यात झालं होतं, तर ९ महिने मनीषा गप्प का राहिली?’ असा प्रश्न देखील ऐश्वर्या हिने उपस्थित केला.

मनीषा हिच्या अफेअरबद्दल ऐश्वर्या म्हणाली, ‘मनीषाच्या आरोपांमुळे मला प्रचंड वाईट वाटलं होतं. राजीव याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांना मनीषा हिने डेट केलं. तेव्हा तिला कोणी काही विचारलं नाही. मनीषा जर दिग्गज अभिनेत्री रेखा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर टीका करु शकते तर, तिच्यासमोर ऐश्वर्या कोण आहे…’ असं देखील मनीषा हिच्याबद्दल ऐश्वर्या म्हणाली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.