लग्नानंतर कुटुंब आणि सासू – सासऱ्यांसोबत कशी राहातेस? ऐश्वर्या राय हिचं सडेतोड उत्तर

aishwarya rai and bachchan family : बच्चन कुटुंब आणि सासू - सासऱ्यांसोबत कशी राहाचे ऐश्वर्या राय? अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिल्यानंतर अभिषेक बच्चन याची प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबाची चर्चा...

लग्नानंतर कुटुंब आणि सासू - सासऱ्यांसोबत कशी राहातेस? ऐश्वर्या राय हिचं सडेतोड उत्तर
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 9:27 AM

मुंबई | 23 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यामध्ये वाद सुरु असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे. अनेक वाद असले तरी बच्चन कुटुंब महत्त्वाच्या क्षणी एकत्र दिसलं. ऐश्वर्या राय हिचं सासरे अमिताभ बच्चन आणि सासू जया बच्चन यांच्यासोबत देखील खास नातं आहे. अनेक मुलाखतींमध्ये जया बच्चन यांनी ऐश्वर्या हिचं कौतुक केलं आहे. एका मुलाखतीत अमिताभ बच्चन म्हणाले होते, ‘ऐश्वर्या सून नाही तर, आमची मुलगीच आहे. एका मुलीची पाठवणी केली आहे, तर दुसऱ्या मुलीचं कुटुंबात स्वागत केलं आहे.’ दरम्यान, एका इंटरनॅशनल शोमध्ये ऐश्वर्याला याबाबत विचारण्यात आलं. त्यानंतर ऐश्वर्या हिने दिलेल्या उत्तरावर होस्ट अवाक झाला आणि सर्वत्र अभिनेत्रीचे कौतुक झालं.

सांगायचं झालं तर, 2005 मध्ये ऐश्वर्याचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’ प्रदर्शित झाला होता. पहिल्या हॉलिवूड सिनेमामुळे ऐश्वर्या तुफान चर्चेत आली होती. त्यामुळे अभिनेत्रीला डेव्हिड लेटरमनच्या लोकप्रिय टॉक शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. शोमध्ये डेव्हिड लेटरमॅनने भारतीय संस्कृतीबद्दल ऐश्वर्या हिला प्रश्न विचारले होतं. डेव्हिड याने ऐश्वर्या हिला विचारलं होतं, ‘तू कुटुंबासोबत राहतेस का? भारतातील सर्व मुले मोठी झाल्यावर त्यांच्या पालकांसोबत राहतात का?’

डेव्हिडी याच्या प्रश्नाचं सडेतोत उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली, ‘एकत्र कुटुंबात राहणं काही वाईट नाही. एकत्र कुटुंबात राहणं ही गोष्ट भारतात सामान्य आहे. आम्हाला आमच्या आई – वडिलांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी अपॉइन्टमेंट घ्यावी लागत नाही…’ या उत्तरानंतर ऐश्वर्या हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर लग्नानंतर देखील पती अभिषेक बच्चन याच्यासोबत ऐश्वर्या ओपरा विन्फ्रेच्या शोमध्ये गेली होती. यावेळी देखील अभिनेत्रीला कुटुंबाबद्दल विचारण्यात आलं. लग्नानंतर कुटुंब आणि सासू – सासऱ्यांसोबत कशी राहतेस? अशा प्रश्नावर ऐश्वर्या म्हणाली, ‘भारतात आई – वडिलांसोबत राहणं फार सामान्य आणि प्रेमळ गोष्ट आहे…’

पत्नीला असा प्रश्न विचारल्यानंतर अभिषेक उलट उत्तर करत होस्ट ओपराला म्हणाला, ‘तू तुझ्या कुटुंबासोबत राहातेस का?’ यावर ओपरा विन्फ्रे हिने स्पष्ट नकार दिला. तेव्हा अभिषेक म्हणाला, आमच्या कुटुंबात आईने एक नियम ठरवून दिला आहे. कितीही व्यक्त असलो तरी, एक वेळचं जेवण एकत्र करायचं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. ऐश्वर्या कायम लेकीसोबत सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. शिवाय अनेक ठिकाणी दोघींना स्पॉट देखील करण्यात येतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.