ऐश्वर्या राय हिच्या Baby Shower चे कधीही न पाहिलेले फोटो समोर; बच्चन कुटुंबाचे आनंदाचे क्षण

ऐश्वर्या राय हिच्या Baby Shower चे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल; 'या' व्यक्तीसोबत दिली खास पोझ... सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा

ऐश्वर्या राय हिच्या Baby Shower चे कधीही न पाहिलेले फोटो समोर; बच्चन कुटुंबाचे आनंदाचे क्षण
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 10:16 AM

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय (aishwarya rai). वयाच्या ४९ व्या वर्षी देखील ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसते. आज ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच ऐश्वर्या मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटनाला उपस्थित होती. तेव्हा अनेकांच्या नजरा ऐश्वर्या आणि लेक आराध्या यांच्यावर येवून थांबल्या. ऐश्वर्याच्या सौंदर्यापुढे सध्याच्या बॉलिवूड अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फिकं आहे. अनेक ठिकाणी ऐश्वर्या पारंपरिक लूकमध्ये दिसते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता सध्या ऐश्वर्याच्या बेबी शॉव्हरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (aishwarya rai family)

ऐश्वर्याच्या बेबी शॉव्हरचे हे फोटो पहिल्यांदा समोर आले आहेत. फोटोमध्ये राय आणि बच्चन कुटुंब आनंदात दिसत आहेत. एका फोटोमध्ये ऐश्वर्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत देखील दिसत आहेत. हा फोटो देखील ऐश्वर्याच्या बेबी शॉव्हरमधील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. फार ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाची चर्चा देखील तुफान रंगली. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केल्यामुळे चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर आजही व्हायरल होत असतात.

लग्नानंतर चार वर्षांनी ऐश्वर्याने गोंडस मुलीला जन्म दिला. महानायक अमिताभ बच्चन यांनी नात आराध्या बच्चन हिला दाखवल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. आता ऐश्वर्याच्या बेबी शॉव्हरचे फोटो व्हायरल होत असल्यामुळे बच्चन कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे.

ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आज अभिनेत्री अभिनयापासून दूर असली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा रंगत आहे. ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अनेक ठिकाणी अभिषेक आणि ऐश्वर्या यांना मुलगी आराध्या हिच्यासोबत स्पॉट केलं जात. शिवाय अभिषेक आणि ऐश्वर्या महत्त्वाचं निमित्त साधत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. शिवाय अभिषेक आणि ऐश्वर्या ही जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडते.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.