Aishwarya Rai-Abhishek Bachchan : का रे दुरावा…! ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचं नातं 17 वर्षांनी का बिघडत चाललंय? ही कारणे वाचाल तर तुम्हालाही…
बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी असलेले ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्यातील बेबनावाच्या, घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र, या जोडप्याकडून किंवा कुटुंबीयांकडून अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु असे अनेक व्हिडिओ आणि विधाने आहेत ज्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे की ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सर्व काही ठीक नाही.
‘आत्तापर्यंत जसा आदर मिळाला आहे, तसाच यापुढेही मिळावा अशी इच्छा आहे. मी जया बच्चन यांच्याप्रमाणे बनू इच्छिते.. ‘ अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या तोंडचं हे वाक्य आहे. खूप वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या सासूबाईंप्रमाण बनण्याची इच्छा व्य्कत केली होती. सोशल मीडियावर एक फोटोही व्हायरल झाला होता ज्यामध्ये ऐश्वर्या ही जया यांच्या खांद्यावर डोकं टेकून बसलेली दिसते. सासू-सुनेमध्ये खूप चांगल बाँडिंग होतं, तेव्हाचा हाँ फोट आहे. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बरीच बदलली आहे. बच्चन कुटुंबाची फॅन फॉलोइंग मजबूत आहे, प्रत्येकाचे चाहते या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतात. पापाराझींनी काढलेल्या, व्हायरल झालेल्या व्हिडिओंवर सतत कमेंट्स केल्या जातात. गेल्या काही काळापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या नात्याबद्दल खूप चर्चेत आहेत. त्यांच्यातील बेबनावाच्या, घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने येत समोर येत आहेत. 2007 साली ते विवाहबद्ध झाले, मात्र गेल्या 17 वर्षांत बरंच काही बदललं, लोकांनी काय नोटीस केलं ?
सध्या ऐश्वर्या राय दुबईत आहे. मुलगी आराध्यासोबत सिमा अवॉर्ड्समध्ये पोहोचली आहे. तेथे आराध्याला बऱ्याच ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. पण या सर्वांदरम्यान एका गोष्टीने सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे ऐश्वर्याच्या हातातली लग्नाची अंगठी. लोकांना ऐश्वर्या रायच्या हातातील अंगठीच दिसली नाही, त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले. याआधी अभिषेक बच्चननेही लग्नाची अंगठी काढली होती. पण नंतर त्याने ती पुन्हा घातली, फ्लाँटही केली आणि सर्व अफवांना पूर्णविराम दिला. पण म्हणतात ना की, “ टाळी एका हाताने वाजत नाही”, तसंच काहीस चित्र दिसत आहे. ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबियांकडन काही अशा गोष्टी घडत आहेत, त्यामुळे घटस्फोटाच्या अफवा उठत आहेत.
17 वर्षांत किती बदललं अभिषेक-ऐश्वर्याचं नातं ?
ऐश्वर्या राय सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चनसोबत ती अनेकदा फोटो शेअर करते. हे फोटो कौटुंबिक कार्यक्रमांचे किंवा एकत्र घालवलेल्या खास क्षणांचे असतात. सहा महिन्यांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. अनेक इव्हेंट्समध्ये ती कुटुंबासमोबत दिसते, पण खास बाँडिंग जाणवत नाही. तर 9 महिन्यांपूर्वी अभिषेकने ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त तिचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र तो तिचा शेवटचा फोटो होता.
जया बच्चनशीही बदललं नातं
आराध्या बच्चनच्या जन्मानंतर एक वेळ अशी आली होती की, की जया बच्चन यांनी सून ऐश्वर्या रायसाठी मीडियाला फटकारले होते. जेव्हा ऐश्वर्याला टोपणनावाने हाक मारली तेव्हा जया बच्चन रागावल्या होत्या. ऐश्वर्या रायच्या बाजूनेही नातं चांगलं होतं. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये ती सासूच्या खांद्यावर डोकं ठेवून आणि त्यांचा हात धरून बसलेली दिसली. त्याचवेळी जया बच्चन यांनी आराध्या बच्चनच्या संगोपनासाठी आपल्या सुनेचेही कौतुक केले. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती ऐश्वर्या रायवर खूप प्रेम करते. पण आता दोघीही एकमेकांशी बोलणे टाळतात. कौटुंबिक मतभेदांमुळे आता अंतरामुळे ऐश्वर्या राय आणि अभिषेकमध्ये अंतर निर्माण झाले आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
ऐश्वर्याची वाट पहात होतं कुटुंब
काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये संपूर्ण बच्चन कुटुंब एका कार्यक्रमाला जाताना दिसत होते. यावेळी, अमिताभ बच्चन आणि बाकीचे कुटुंब ऐश्वर्या रायच्या येण्याची वाट पाहत होते. पण ती आलीच नाही. त्या व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या, बच्चन कुटुंबात काहीच आलबेल नसल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता.
अंबानींच्या सोहळ्यात स्पष्ट दिसली दरी
अलीकडेच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचं लग्न झआलं, त्यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब पुन्हा चर्चेत आलं. कारण त्या सोहळ्यासाठी अभिषेक बच्चन हाँ वडील, आई, बहीण, भाच्यांसह तिथे पोहोचला, पण त्याची पत्नी ऐश्वर्या आणि आराध्या कुठेच दिसल्या नाहीत. काही वेळानंतर त्या दोघींनी वेगळी, एकत्र एंट्री केली. संपूर्ण कुटुंब एका बाजूला आणि या दोघी दुसरीकडे असं चित्र दिसत होतं. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांना आणखीनच खतपाणी मिळाले.
श्वेता बच्चनला घर दिल्याने ऐश्वर्या नाराज ?
ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची नणंद श्वेता बच्चन या दोघींमध्ये फार काही आलेबल नाही, हे चित्र खूप आधीपासूनच स्पष्ट दिसत होतं. काही काळापूर्वीच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांच्या लेकीला, श्वेता बच्चन हिला एक बंगला गिफ्ट केला. ‘प्रतीक्षा’ हाँ बंगला श्वेताला देण्यात आला, मात्र त्यामुळे ऐश्वर्या खूप नाराज असल्याचे अनेक रिपोर्ट्स समोर आले होते. मात्र बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आत्तापर्यंत या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही, अभिषेक-ऐश्वर्यानेही अद्याप मौन राखणंच पसंत केलंय.