PS- 1: टॉपच्या सेलिब्रिटींचा असाही साधेपणा; ए. आर. रेहमान, ऐश्वर्याच्या फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
टॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबत ऐश्वर्याचा 'इकॉनॉमी क्लास'ने प्रवास; फोटो व्हायरल
![PS- 1: टॉपच्या सेलिब्रिटींचा असाही साधेपणा; ए. आर. रेहमान, ऐश्वर्याच्या फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष PS- 1: टॉपच्या सेलिब्रिटींचा असाही साधेपणा; ए. आर. रेहमान, ऐश्वर्याच्या फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/26175442/A-R-Rehman.jpg?w=1280)
मुंबई: सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (PS- 1) हा बिग बजेट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांसोबतच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही (Aishwarya Rai Bachchan) महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांसोबतच हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हैदराबाद आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी कलाकारांकडून प्रमोशन करण्यात येत आहे. या प्रमोशनदरम्यान ‘पीएस 1’मधल्या स्टार्सच्या एका गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.
मणिरत्नम यांच्या या चित्रपटाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. नुकताच रेहमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. विमानातून प्रवास करतानाचा हा फोटो होता. सहसा सेलिब्रिटी हे बिझनेस क्लासमधून आरामदायी प्रवास करतात. मात्र पीएस 1 च्या कलाकारांनी बिझनेस क्लासमधला आरामदायी प्रवास न निवडता इकॉनॉमी क्लासने प्रवास केला.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/25005603/Abhilipsa-Panda.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/25003438/hema-rakhi-and-kangana.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/24231238/Rana-and-Vyankatesh.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/24224623/Raj-Kundra-and-Urfi-Javed.jpg)
View this post on Instagram
ए. आर. रेहमान यांनी प्रसिद्ध साऊथ स्टार चियान विक्रमसोबत विमानात सेल्फी काढला. हाच सेल्फी त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘पीएस 1 च्या प्रमोशनसाठी माझ्यासोबत हैदराबादहून मुंबईचा प्रवास कोण करतंय, ते पहा’, असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला.
या फोटोमधील ऐश्वर्या रायने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘आम्ही फोटो झूम करून ऐश्वर्याला पाहतोय’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘ऐश्वर्या राय बच्चन’ असं नाव लिहित अनेकांनी कमेंट्समध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. ए. आर. रेहमान आणि विक्रम यांच्या बाजूच्या सीटवर ऐश्वर्या आणि त्रिशा बसलेल्या आहेत.
मुंबईत कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत या कलाकारांचं स्वागत करण्यात आलं. पोन्नियिन सेल्वन- 1 हा चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिका साकारणार आहे.