Aishwarya Rai Bachchan ची लेक आराध्या हिच्याबद्दल स्पष्ट भूमिका; संताप व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

बच्चन कुटुंबाची लेक आराध्या हिच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणाऱ्यावर संतापली ऐश्वर्या राय बच्चन.. बच्चन कुटुंबाने देखील नाराजी व्यक्त करत घेतली न्यायालयात धाव... प्रकरणावर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया...

Aishwarya Rai Bachchan ची लेक आराध्या हिच्याबद्दल स्पष्ट भूमिका; संताप व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली...
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 12:28 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन तुफान चर्चेत आहे. आराध्या बच्चन हिच्या प्रकृतीबाबत व्हायरल झाल्यामुळे अफवांमुळे ती चर्चेत आली होती. लेकीबद्दल पसरलेल्या अफवांवर बच्चन कुटुंबाने नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर, बच्चन कुटुंबाने आराध्याच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर न्यायालयाने बच्चन कुटुंबाला दिलासा देत फेक न्यूज तत्काळ हटवण्याचे आदेश दिले. यासोबतच अशा फेक न्यूजसाठी एका विशेष वाहिनीलाही फटकारलं. यावर ऐश्वर्या राय हिची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्याने आराध्या हिच्याबद्दल घेतलेल्या स्पष्ट भूमिकेची चर्चा रंगत आहे.

‘पोन्नियन सेलवन 2’ (PS2) सिनेमाच्या पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेत्रीने याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच आराध्याच्या तब्येतीची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही बातमी जेव्हा अभिषेक बच्चन आणि घरातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचली तेव्हा ते चांगलेच संतापले. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली.

‘पोन्नियन सेलवन 2’ (PS2) सिनेमाच्या पत्रकार परिषदेदरम्यान ऐश्वर्याला या विषयावर विचारण्यात आले तेव्हा तिने याला ‘अनावश्यक आणि असंवेदनशील’ म्हटलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘ज्या गोष्टी योग्य आहेत त्यांनाच माध्यमे महत्त्व देत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मला आशा आहे की पुढे देखील अशाच बातम्या समोर येतील. खोट्या बतम्यांचा प्रचार होणार नाही. नकारात्मक बातम्या ओळखल्याबद्दल आणि त्याचा प्रचार न केल्याबद्दल धन्यवाद.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘चुकीच्या बातम्या अनावश्यक आणि असंवेदनशील असतात. कृपया अशा बातम्या पसरू देऊ नका. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक मुलाला समान अधिकार आहेत. यूट्यूबची देखील जबाबदारी आहे की, खोट्या बातम्यांवर त्यांनी बंदी घालायला हवी…. ‘ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

याआधी देखील आराध्याला ट्रोल करणाऱ्यांनी अभिषेकने दिलं सडेतोड उत्तर

आराध्याला कायम ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत स्पॉट केलं जातं. वयाच्या 11 व्या वर्षी आराध्याने अनेकदा ट्रोलिंगचा सामना केला. डिसेंबर 2021 मध्ये अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर त्याची मुलगी आराध्याला ट्रोल करणाऱ्या सडेतोड उत्तर दिलं होतं.

अभिषेक म्हणाला, “मी स्वत: सेलिब्रिटी असल्याने माझ्यावर झालेल्या टीकांना मी सहन करू शकतो पण आराध्याला लक्ष्य करणं हे मला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ते मी सहन करणार नाही. मी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे मला ट्रोल करण्यापर्यंत ठीक आहे. पण माझ्या मुलीला त्यात ओढू नका. जर तुम्हाला खरंच काही म्हणायचं असेल तर तोंडासमोर येऊन बोला”, असं तो म्हणाला होता.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.