Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बसल्या जागी तिच्या पदरात चित्रपटांचे ऑफर्स पडतात”; ऐश्वर्या रायची आलिया भट्टवर सडकून टीका

करण जोहरने त्याच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून आलिया भट्टला लाँच केलं होतं. त्यानंतर तिने 'हायवे', 'टू स्टेट्स', 'डिअर जिंदगी', 'राजी', 'गंगुबाई काठियावाडी', 'डार्लिंग्स', 'ब्रह्मास्त्र' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

बसल्या जागी तिच्या पदरात चित्रपटांचे ऑफर्स पडतात; ऐश्वर्या रायची आलिया भट्टवर सडकून टीका
Aishwarya Rai and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 3:09 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरून नेहमीच चर्चा होते. अनेकदा ही चर्चा इतकी वाढते की त्यावरून वाद निर्माण होतात. फिल्म इंडस्ट्रीत आणि सर्वसामान्यांमध्ये ही बाब जगजाहीर आहे की कलाकारांच्या मुलांना म्हणजेच स्टार किड्सना सहज संधी मिळतात. याउलट ज्यांचा कोणी गॉडफादर नसतो, त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. अशाच गोष्टीवरून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही खदखद व्यक्त केली होती. तेसुद्धा अभिनेत्री आलिया भट्टबद्दल. आलियाला करिअरच्या सुरुवातीपासूनच करण जोहरने खूप पाठिंबा दिला आणि त्यामुळे चांगल्या संधी थेट तिच्या पदरात पडतात, असं ऐश्वर्या म्हणाली होती.

ऐश्वर्याचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळेच आलिया भट्टविरोधातील तिचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. स्टारकिड असल्याने आलियाला मिळणाऱ्या फायद्यांवर ऐश्वर्याने मत व्यक्त केलं होतं. 2018 मध्ये ‘फन्ने खान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती याविषयी बोलली होती.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाली होती ऐश्वर्या?

आलियाला मिळणाऱ्या सुवर्णसंधींबद्दल ऐश्वर्या म्हणाली होती, “मी तिलासुद्धा म्हटलं होतं की तुझ्यासाठी ही शानदार बाब आहे. ज्या पद्धतीचं समर्थन तिला करण जोहरने सुरुवातीपासूनच दिलं आहे आणि एका आरामदायी वातावरणात तुम्हाला संधी मिळाल्या आहेत. यावरून तुम्हाला माहीत असतं की हे कठीण नाही. या गोष्टी तुम्हाला फार काळापासून मिळत आहेत. एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आपल्यासमोर फक्त चांगल्या संधी आहेत, ती गोष्ट खूप खास असते.”

“पण यात चांगली गोष्ट म्हणजे आलियासुद्धा चांगलं काम करतेय. तिच्या पदरात सातत्याने चांगल्या संधी पडत असताना ती सुद्धा चांगलं काम करतेय”, असंही ऐश्वर्या पुढे म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी ऐश्वर्याचं कौतुक करत आहेत. ‘ती खरंच बोलतेय. मिस वर्ल्ड जिंकल्यानंतरही तिला बराच संघर्ष करावा लागला होता. अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी तिला बराच वेळ लागला’, असं एकाने लिहिलं. तर ‘ती टीका करत नाहीये तर सत्य सांगतेय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून आलिया भट्टला लाँच केलं होतं. त्यानंतर तिने ‘हायवे’, ‘टू स्टेट्स’, ‘डिअर जिंदगी’, ‘राजी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘डार्लिंग्स’, ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.