Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायने टाकलं बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे; संपत्तीच्या बाबतीत अग्रस्थानी

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी जीवनाबद्दल सध्या बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बच्चन परिवारात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा रोज सुरू असतात. मात्र अशातच ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या संपत्तीच्या बाबतीतही अव्वल स्थानावर आली आहे. ऐश्वर्या बच्चनने संपत्तीच्या बाबतीत अनेक नामवंत अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

Aishwarya Rai Bachchan :  ऐश्वर्या रायने टाकलं बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे; संपत्तीच्या बाबतीत अग्रस्थानी
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 8:56 AM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : बॉलीवूडमध्ये स्वारस्य असलेल्या अनेकांना त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल खूप काही जाणून घ्यायचे असते. त्यांचा आवडता रंग असो किंवा त्यांचे आवडते खाद्यपदार्थ, सिनेप्रेमी त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल आणि अभिनेत्रीबद्दल हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. दरम्यान, काही लोक तर सर्वात श्रीमंत स्टार कोण हे जाणून घेण्यासही उत्सुक असल्याचेही दिसून येते.याचदरम्यान आता एक नवी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे नमूद करण्यात आले आहे. बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या राय बच्चन हिचे लाखो चाहते आहेत. त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, पण संपत्तीच्या बाबतीतही ऐश्वर्या अनेक अभिनेत्रींपेक्षा वरचढ आहे.

ऐश्वर्या राय बच्चन अव्वल स्थानी

ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती बॉलिवूडची नामवंत अभिनेत्री तर आहेच पण संपत्तीच्या बाबतीतही ती टॉपवर आहे. ऐश्वर्या राय बच्चन हिने संपत्तीच्या बाबतीत प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, करीना कपूर आणि माधुरी दीक्षित या नामवंत अभिनेत्रीनांही मागे टाकले आहे. भारतातील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्रींची यादी समोर आली आहे. या बाबतीत ऐश्वर्या अव्वल स्थानी आहे. तर या यादीत नयनतारा दहाव्या स्थानावर आहे. नयनतारा 100 कोटींची मालकीण आहे. तर सर्वात श्रीमंत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची संपत्ती 800 कोटी रुपये आहे. ती सध्या चित्रपटांमध्ये खूप ढळकत नसली तरी ब्रँड्स, जाहिराती यातूनही ती कोट्यवधी रुपये कमावते.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्याच्या खासगी जीवनाबद्दल चर्चा

ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी जीवनाबद्दल सध्या बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बच्चन परिवारात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा रोज सुरू असतात. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याबद्दलही रोज नव्या अफवा उठतात. श्वेता बच्चनशी जमत नाही, ऐश्वर्या तिच्या सासू-सासऱ्यांसोबत न राहता आईकडे रहायला गेली, अशा एक ना अनेक अफवा रोज कानावर पडत असतात.तिच्या कामपेक्षा ऐश्वर्या राय बच्चन ही तिच्या पर्सनल गोष्टींमुळेच चर्चेत आहे. पण यावर आत्तापर्यंत ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता ती श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे, ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंददायी आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.