Aishwarya Rai | ‘या हेअरस्टाइलमागे काय सिक्रेट असावं बरं’; ऐश्वर्या रायला लूकवरून केलं ट्रोल

याआधी ऐश्वर्या तिच्या लूकमुळेही ट्रोल झाली होती. आज सलमान खान तुला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडत असेल, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने ट्रोल केलं. तर तिने चेहऱ्यावर खूपच बोटॉक्स केलं आहे, असं दुसऱ्याने म्हटलं होतं.

Aishwarya Rai | 'या हेअरस्टाइलमागे काय सिक्रेट असावं बरं'; ऐश्वर्या रायला लूकवरून केलं ट्रोल
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 7:42 PM

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन – 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनदरम्यानचा ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला तिच्या हेअरस्टाइलवरून ट्रोल केलंय. ऐश्वर्याला नेहमी एकाच हेअरस्टाइलमध्ये पाहिलं जातं. त्यामुळे वैतागलेल्या नेटकऱ्यांनी तिला त्यामागचं सिक्रेट विचारलंय. पापाराझींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

गेल्या काही वर्षांत ऐश्वर्या कोणत्याही पार्टीत, कार्यक्रमात किंवा सहज एअरपोर्टवर जरी दिसली तरी तिचा एकच लूक पहायला मिळाला. याआधीही बऱ्याच व्हिडीओंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी ऐश्वर्यावर तिच्या हेअरस्टाइलमुळे निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

‘प्रत्येकवेळी हीच हेअरस्टाइल करण्यामागे तिचं काही तरी गुपित असेल असं मला वाटतं’, असं एकाने लिहिलंय. तर ऐश्वर्या तिच्या गालावरचे फिलर्स लपवण्याचा प्रयत्न करतेय, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘या हेअरस्टाइलमागचं गुपित आहे तरी काय? ती का बदलू शकत नाही? तिच्या मुलीचंही हेअरस्टाइल ती बदलत नाहीये’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

याआधी ऐश्वर्या तिच्या लूकमुळेही ट्रोल झाली होती. आज सलमान खान तुला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडत असेल, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने ट्रोल केलं. तर तिने चेहऱ्यावर खूपच बोटॉक्स केलं आहे, असं दुसऱ्याने म्हटलं होतं. ऐश्वर्याने तिच्या चेहऱ्यावर नेमकं काय केलंय, असाही सवाल काहींनी केला होता. ऐश्वर्याने स्वत:च्याच सौंदर्याची वाट लावली, अशी टीका युजर्सनी केली होती.

दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोन्नियिन सेल्वन’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मल्टिस्टारर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा नंदिनीची दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. पोन्नियिन सेल्वन 1 मध्ये चोल सम्राट राजराजा 1 अरुलमोझिवर्मन (पोन्नियिन सेल्वन- (947-1014)) यांच्या सुरुवातीच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात जयम रवी हे अरुलमोझिवर्मनच्या भूमिकेत होते. तर विक्रम, कार्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या यांनी इतर महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.