सलमान – ऐश्वर्याने केलं होतं गुपचूप लग्न? अभिनेत्रीने दिलेलं ‘ते’ उत्तर म्हणजे…

Aishwarya Rai Wedding Rumours With Salman Khan: लोनावळ्याचा बंगला, मुंबईतील काझी आणि सलमान - ऐश्वर्या याचा पार पडलेला निकाह? रंगणाऱ्या चर्चांवर ऐश्वर्या दिलेल्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा..., सध्या सर्वत्र चर्चांना उधाण...

सलमान - ऐश्वर्याने केलं होतं गुपचूप लग्न? अभिनेत्रीने दिलेलं 'ते' उत्तर म्हणजे...
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 1:11 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान याच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. एका काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म देखील दिला. पण सलमान खान आजही एकटाच आयुष्य जगत आहे. आज ऐश्वर्या आणि सलमान त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण एक काळ असा देखील होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या यांनी गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांनी तुफान जोर धरला होता. पण दोघांनी देखील यावर कधी वक्तव्य केलं नाही. पण रिपोर्टनुसार, निकाह सोहळा होता, जो लोनावळा येथील बंगल्यात पार पडला होता. हा निकाह सोहळा मुंबईतील काझींना संपन्न केला होता. ऐश्वर्या हिने लग्नासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता… अशा देखील अफवा तुफान रंगल्या होच्या. दोघांच्या निकाह सोहळ्याच जवळचे मित्र सहभागी झाले होते… असं देखील सांगितलं जात होतं.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, सलमान – ऐश्वर्या यांचे आई – वडील देखील लग्नात सहभागी झाले नव्हते. लग्नानंतर सलमान – ऐश्वर्या न्यूयॉर्क याठिकाणी हनीमूनसाठी देखील गेल्याच्या चर्चांनी जोर धरला होता आणि मुंबईत परतल्यानंतर दोघांना स्पॉट करण्यात आलं होतं… अशा अनेक चर्चा दोघांच्या नात्याबद्दल रंगल्या होत्या.

सांगायचं झालं तर, सलमान खान याच्यासोबत ऐश्वर्याचं नातं अभिनेत्री आई – वडिलांना कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे रंगणाऱ्या चर्चांचा अभिनेत्रीच्या कुटुंबावर वाईट परिणाम झाला. शिवाय ऐश्वर्या हिच्यासोबत सिनेमे साईल केल्यामुळे निर्मात्यांना देखील चिंता सतावत होती.

लग्नाच्या चर्चांवर ऐश्वर्याची प्रतिक्रिया

सलमान खान याच्यासोबत लग्नाच्या चर्चा तुफान रंगल्यानंतर, अभिनेत्री शांतपणे रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं. ‘जर असं काही झालं असतं, तर संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती झालं असतं. इंडस्ट्री फार छोटी आहे. एवढंच नाही तर, माझ्या आईसोबत झालेल्या दुर्घटनेनंतर मला माझ्या कुटुंबियांसोबत देखील वेळ व्यतीत करण्यासाठी वेळ नसतो… मझ्या लग्नाची गोष्ट असेल तर, मी स्वतः गर्वाने सांगेल… माझ्याकडे लग्न करण्यासाठी वेळ नाही… असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपचं कारण

जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या राय हिने सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप का झालं? याचं कारण सांगितलं होतं. ‘सलमान खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सलमानचे मद्यपी गैरवर्तन, शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, फसवणूक आणि अपमान सहन केला.’ याच कारणामुळे सलमान – ऐश्वर्या यांचं ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.