ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा करणाऱ्यांना ‘हा’ व्हिडीओच देऊ शकेल उत्तर

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थित राहिल्यानंतर ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीय मुंबईत परतले आहेत. कलिना एअरपोर्टवरील ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात ती नणंद श्वेता बच्चनसोबत गप्पा मारताना दिसून येत आहे.

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा करणाऱ्यांना 'हा' व्हिडीओच देऊ शकेल उत्तर
अभिषेक, ऐश्वर्या, श्वेताImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 3:52 PM

मुंबई : 4 मार्च 2024 | गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि सून ऐश्वर्या या दोघींमध्ये पटत नसल्याचंही म्हटलं गेलं. श्वेता आणि ऐश्वर्या यांच्यात बरेच मतभेद आहेत, अशी चर्चा होती. मात्र सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा करणाऱ्यांना उत्तर तर मिळेलच. पण त्याचसोबत श्वेता आणि ऐश्वर्या यांच्यात काही आलबेल नाही म्हणणाऱ्यांनाही सर्वकाही स्पष्ट होईल. बच्चन कुटुंबीय हे अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी जामनगरला गेले होते. तिथून परतल्यानंतर मुंबई विमानतळावरचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि श्वेता हे मुंबईच्या कलिना एअरपोर्टमधून बाहेर पडताना एकमेकांशी चर्चा करताना दिसून येत आहेत. त्यानंतर अमिताभ बच्चन हे नात आराध्या बच्चनला घेऊन बाहेर येतात. तर अभिषेक हा पत्नी ऐश्वर्या आणि बहीण श्वेता यांच्यासोबतच येत असतो. या व्हिडीओच्या अखेरीस ऐश्वर्या आणि आराध्या हे श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदाला मिठी मारताना दिसून येत आहेत.

Aishwarya and Shweta seen together returning byu/skyfullofstars19 inBollyBlindsNGossip

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी पॅरिस फॅशन वीकदरम्यान श्वेताची मुलगी नव्या नंदाने रॅम्पवर पदार्पण केलं होतं. त्यावेळी जया बच्चन आणि श्वेता हे पुढच्या रांगेत बसून नव्यासाठी चिअर करत होते. याच फॅशन वीकमध्ये ऐश्वर्यानेसुद्धा रॅम्प वॉक केला होता. मात्र श्वेताने तिच्यासाठी कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. आता अंबानींच्या कार्यक्रमातील आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. यामध्ये तिघं ढोलच्या गजरावर आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

सध्या फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवरील अकाऊंट उघडलं की सर्वाधिक फोटो आणि व्हिडीओ जामनगरचेच पहायला मिळत आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगची धमाल या विविध फोटो आणि व्हिडीओंमध्ये पहायला मिळतेय. देशभरातील सर्व नामांकित सेलिब्रिटी आणि त्याचसोबत परदेशाहून विविध दिग्गज या प्री-वेडिंगला उपस्थित होते. अंबानींच्या या प्री-वेडिंग कार्यक्रमाला बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटी उपस्थित होते. बच्चन कुटुंबीयांचं अंबानी कुटुंबाशी खास नातं आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबीय या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.