Salman Khan सोबत झालेल्या ब्रेकअपबद्दल का बोलत नाही ऐश्वर्या राय? अखेर अभिनेत्रीने सोडल मौन

'स्वतःला संकटापासून दूर केलं आहे, कारण...', सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या' व्यक्तींमुळे शांत होती ऐश्वर्या राय.. अखेर अभिनेत्रीने नात्यावर सोडलं मौन

Salman Khan सोबत झालेल्या ब्रेकअपबद्दल का बोलत नाही ऐश्वर्या राय? अखेर अभिनेत्रीने सोडल मौन
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 10:35 AM

मुंबई : एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा होती. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचडं आवडली. मोठ्या पडद्यावरच नाही तर, खऱ्या आयुष्यात देखील सलमान – ऐश्वर्या ही जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर ऐश्वर्याने सलमान खानपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. आज ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण आजही सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते. ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी ऐश्वर्याने सलमानसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं.

ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर अनेक आरोप लावले होते. ऐश्वर्यासाठी सलमान खूप पझेसिव्ह होता. याच कारणामुळे दोघांचं ब्रेकअप झालं. सलमान खान आणि ऐश्वर्या राय याच्या ब्रेकअपनंतर दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सलमान खान अनेकदा भांडण करायचा आणि दुसऱ्या दिवशी शुटिंगच्या सेटवर यायचा आणि काही झालंच नाही, अशी वागणूक करायचा… असं देखील ऐश्वर्या मुलाखतीत म्हणाली.

ऐश्वर्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं की, स्वतःला संकटापासून दूर केलं आहे, कारण २००१ मध्ये सलमान खान मध्यरात्री अभिनेत्रीच्या घरी आला आणि वाद करण्यास सुरुवात केली. तेव्हा ऐश्वर्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देखील केली. एवढंच नाही तर, अभिनेत्री घराबाहेर येत नसल्यामुळे सलमानने स्वतःला संपवण्याची देखील धमकी दिली. शिवाय ब्रेकअपबद्दल का बोलत नाही यावर देखील अभिनेत्री मौन सोडलं.

हे सुद्धा वाचा

सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री ब्रेकअपबद्दल न बोलण्याचं कारण सांगितलं. ऐश्वर्या म्हणाली, ‘मला असं वाटतं ती गोष्ट आता संपलेली आहे. त्या गोष्टीवर बोलणं सोडा मी विचार देखील करत नाही आणि सर्वाजनिक प्लॅटफॉर्मवर तर बिलकूल नाही. यासर्व गोष्टी माझ्या भूतकाळातील आहेत आणि त्या तिथेच राहिल्या पाहिजे. मला यावर बोलायला आवडत नाही कारण मी माझ्या कुटुंबासोबत राहते. माझ्या कुटुंबातील सदस्य देखील मला ऐकत असतात.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी ज्यांच्याबद्दल बोलत आहे, त्याचं देखील कुटुंब आहे. सर्वांसमोर काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. म्हणून मला भूतकाळाबद्दल बोलायला आवडत नाही. मी एक सामान्य मुलगी आहे, हे मी विसरलेली नाही आणि मी ज्यांच्याबद्दल बोलत आहे, ते देखील सामान्य व्यक्ती आहेत…’ असं देखील ऐश्वर्या म्हणाली.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.