ऐश्वर्या राय पेक्षा उत्तम डान्सर आहे लेक आराध्या बच्चन, Video तुफान व्हायरल

Aaradhya Bachchan Dance Video: आराध्या बच्चन हिचा डान्स पाहून चाहते थक्क... आई ऐश्वर्या राय पेक्षाही उत्तम डान्स करते आराध्या... व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... बच्चन कुटुंबाची लेक असल्यामुळे आराध्या कायम असते चर्चेत...

ऐश्वर्या राय पेक्षा उत्तम डान्सर आहे लेक आराध्या बच्चन, Video तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:50 AM

Aaradhya Bachchan Dance Video: बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोर धरला आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर वक्तव्य करत महानायक अमिताभ बच्चन यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. ‘तर्क फक्त तर्क असतात…’ असं वक्तव्य बिग बी यांनी केलं होतं. दरम्यान, बच्चन कुटुंब चर्चेत असताना सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या – अभिषेक यांची लेक आराध्या बच्चन हिचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ आराध्याच्या लहानपणीचा आहे. व्हिडीओमध्ये आराध्या शाळेच्या एनुअल फंक्शनमध्ये डान्स करताना दिसत आहे. आराध्या हिने गुलाबी रंगाचा फ्रॉक, डेनिम आणि केसांना क्यूट हेअर बँड लावला आहे. व्हिडीओमध्ये आराध्याला डान्स करताना पाहून अनेक जण तिचं कौतुक करत आहेत.

हे सुद्धा वाचा

आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्याची लेक धीरुबाई अंबानी स्कूलमध्ये शिकत आहे. शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आराध्या कायम भाग घेत असते. सोशल मीडियावर आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

ऐश्वर्या – अभिषेक यांची लेक असल्यामुळे आराध्या कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याची देखील चर्चा आहे.

आराध्या हिला कायम आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. ऐश्वर्या देखील आराध्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचं लग्न

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. 2007 मध्ये ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला. अनेक वर्ष एकत्र आनंदी राहिल्यानंतर आता ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.