मुंबई | 18 डिसेंबर 2023 : एक काळ होता जेव्हा अभिनेत्री ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी, करीना कपूर, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान यांनी चाहत्यांच्या मनावर राज्या केलं. सेलिब्रिटी फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत होते. पण आता सेलिब्रिटींची मुलं तुफान चर्चेत असतात. अभिनेता शाहरुख याची मुलं कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची लेक आराध्या बच्चन देखील कायम चर्चेत असते.
नुकताच, अनेक स्टार किड्सचा एनुअल डे शाळेत मेठ्या उत्साहात साजरा झाले. अनेक सेलिब्रिटींची मुलं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत आहेत. नुकताच शाळेचा एनुअल डे कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. सोशल मीडियावर सध्या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.
शाळेच्या एनुअल डे कार्यक्रमात आराध्या बच्चन हिने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. तर किंग खान याचा मुलगा अबराम खान याने वडिलांची सिग्नेचर पोज दिली. दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, आराध्या आणि अबराम यांचा एक व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओमध्ये आराध्या, अबराम याचे लाड करताना दिसत आहे.
आराध्या आणि अबराम यांना पाहिल्यानंतर चाहत्यांना ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान यांची आठवण आली. ‘जोश’ सिनेमात निभावलेल्या भूमिकेमुळे दोघे तुफान चर्चेत आले होते. आज देखील ‘जोश’ सिनेमाला चाहते विसरु शकलेले नाही. शिवाय आराध्या आणि अबराम यांचा व्हिडीओ देखील चाहत्यांना आवडत आहे.
आराध्या आणि अबराम यांचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आराध्या हिला कायम आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. ऐश्वर्या देखील लेकीसोबत अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. चाहते देखील दोघींच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.
शाहरुख खान देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. अभिनेता लवकरच ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र किंग खान स्टारर ‘डंकी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.