रॅम्प वॉकदरम्यान ऐश्वर्या रायसोबत घडलं असं काही..; अभिनेत्रीच्या आत्मविश्वासाचं होतंय कौतुक

अभिनेत्री ऐश्वर्या रायने नुकतीच 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये हजेरी लावली. यावेळी रॅम्पवॉकदरम्यान ऐश्वर्याच्या ड्रेसचा एक भाग निघाला. तरीही जराही न डगमगता तिने रॅम्प वॉक पूर्ण केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच ऐश्वर्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

रॅम्प वॉकदरम्यान ऐश्वर्या रायसोबत घडलं असं काही..; अभिनेत्रीच्या आत्मविश्वासाचं होतंय कौतुक
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 11:26 AM

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकशिवाय ‘पॅरिस फॅशन वीक’ पूर्णच होऊ शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या ही लॉरियल पॅरिसची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. दरवर्षी ‘पॅरिस फॅशन वीक’दरम्यान ऐश्वर्याच्या रॅम्प वॉकची असंख्य चाहत्यांना खूप उत्सुकता असते. यावर्षीही ऐश्वर्याने रॅम्प वॉक केला आणि त्याचे विविध फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी ऐश्वर्याने लाल रंगाचा लांब ट्रेलवाला गाऊन परिधान केला होता. तिच्या सौंदर्याची चर्चा तर होतेच आहे, मात्र त्याचसोबत एका व्हिडीओ नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय. रॅम्प वॉकदरम्यान ऐश्वर्यासोबत ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ची घटना घडते. मात्र तरीही जराही आत्मविश्वास न गमावता ती चेहऱ्यावर हास्य ठेवून वॉक पूर्ण करते. त्यामुळे ऐश्वर्याचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

ऐश्वर्याने रॅम्प वॉकदरम्यान जो लाल रंगाचा बलून ड्रेस परिधान केला होता, त्याला सात मीटर लांब ट्रेल (ड्रेसला जोडून असलेला कापड) जोडलेला होता. या ट्रेलवर ब्रँडची टॅगलाइनसुद्धा लिहिलेली होती. ऐश्वर्या जेव्हा स्टेजवर आली, तेव्हा तिचा ड्रेस सांभाळण्यासाठी चार-पाच चण स्टेजवर आले होते. त्यानंतर जेव्हा ऐश्वर्याने रॅम्प वॉक सुरू केला तेव्हा ड्रेसचा ट्रेल स्टेजवर तिथेच पडला. तरीही ऐश्वर्याने ही गोष्ट जाणवू दिली नाही. तिच्या चेहऱ्यावरील हावभावात कुठलाही बदल झाला नाही. तिने तितक्याच आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला. यावेळी नेहमीप्रमाणे ऐश्वर्याने चाहत्यांना फ्लाइंग किस दिला आणि स्टेजच्या समोर आल्यानंतर ‘नमस्ते’ करून सर्वांची मनं जिंकली. वॉक संपत असताना ऐश्वर्याने तो ट्रेल उचलून पुन्हा गाऊनला जोडला, तेव्हा लोकांना त्या गोष्टीची जाणीव झाली.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी तिचं कौतुक करण्यास सुरुवात केली. ‘अनुभवी कलाकार कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘खऱ्या अर्थाने ती मिस वर्ल्ड आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘बॉलिवूडमधील अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री’, अशा शब्दांत चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय. ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्यासुद्धा पोहोचली होती. आराध्याचेही विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.