अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली ऐश्वर्या राय, मोठे विधान करत म्हणाली..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे तूफान चर्चेत आहेत. हे दोघेही त्यांच्या चित्रपटामुळे नव्हे तर त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा ही सातत्याने रंगताना दिसतंय. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. ऐश्वर्या राय हिने आपला वाढदिवस आराध्या आणि आपल्या फॅमिलीसोबत साजरा केला. सतत चर्चा आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हे टोकाला गेले आहेत आणि ते लवकरच विभक्त होतील. मात्र, यावर भाष्य कोणीही केले नाहीये.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये मतभेद झाले किंवा त्यांच्यामधील वाद झालाय. ही चर्चा काही पहिल्यांदाच रंगली असे अजिबातच नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सतत यांच्या वादाच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना देखील सोशल मीडियावर अनफाॅलो केले आहे.
ऐश्वर्या राय हिने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बोलताना दिसली. रिपोर्टनुसार या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय हिने थेट अभिषेक बच्चन याला बेस्ट पती असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने अभिषेक याच्याबद्दल प्रेम आणि आदर देखील व्यक्त केला.
ऐश्वर्या राय हिची ही मुलाखत तशी जुनी आहे. सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा दररोजच सुरू आहेत. मात्र, यावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांनीही काहीच भाष्य हे केले नाहीये. किंवा बच्चन कुटुंबियांपैकी देखील कोणीही यावर भाष्य केले नाहीये. यामुळे कुठेतरी चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे मुलगी आराध्या बच्चन हिच्या शाळेतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले. मात्र, यावेळी दोघेही वेगळ्या गाड्यांमध्ये आले. सोशल मीडियावर काही व्हिडीओही जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. यापैकी एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याला पाहून त्याच्याकडे बोलण्यासाठी येत होती.
ऐश्वर्या राय हिला आपल्याकडे येताना पाहून अभिषेक बच्चन हा तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाताना दिसला. यावेळी ऐश्वर्या राय हिच्या चेहऱ्याचे हावभाव बरच काही सांगून गेले. हा व्हिडीओ पाहून चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरच घटस्फोट घेणार का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. मात्र, यावर फार काही भाष्य केले जात नाहीये.