ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विभक्त?, थेट सोडले जलसा निवासस्थान, घटस्फोटाची जोरदार चर्चा
ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आहे.
मुंबई : ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. इतकेच नाही तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याचे सतत सांगितले जातंय. मात्र, यावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी भाष्य करणे टाळले. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर अनफाॅलो केले इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी देखील ऐश्वर्या राय हिला अनफाॅलो केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय, यांचा वाद हा टोकाला गेल्याचे बघायला मिळतंय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच आता मोठी माहिती पुढे आलीये. रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय बच्चन हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे. घटस्फोटाच्या अगोदरच अभिषेक याच्या घरातून ऐश्वर्या राय ही बाहेर पडलीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या नात्यावर दुरावा आलाय.
ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याचे घर सोडून तिच्या आईच्या घरी राहण्यास गेल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. काही दिवसांपासूनच ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी राहत आहे. आता जवळपास हे निश्चित दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही सुरळीत नक्कीच नाहीये.
ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी राहण्यास गेल्याचे कळाल्यापासून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा खरोखरच घटस्फोट होणार का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोण काय भाष्य करते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
ऐश्वर्या राय हिचे सासू जया बच्चनसोबत अजिबातच जमत नसल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर असेही सांगितले जाते की, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय या गेल्या कितीतरी दिवसांपासून एकमेकींना बोलत नाहीत. ननंद श्वेता बच्चन हिच्यासोबत देखील ऐश्वर्या राय हिचे संबंध अजिबातच चांगले नाहीत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना श्वेता बच्चन ही दिसली होती. ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयींबद्दल बोलताना श्वेता बच्चन दिसली होती.