Aishwarya Rai ला उगाच नाही म्हणत बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री; आहे गडगंज संपत्तीची मालकीण

Aishwarya Rai : भारतातच नाही तर परदेशात देखील ऐश्वर्या राय हिची कोट्यवधींची संपत्ती... ऐश्वर्या फक्त अभिनेत्री नाही तर, बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री... सध्या सर्वत्र ऐश्वर्या हिची संपत्ती, महागड्या गाड्या आणि रॉयल आयुष्याची चर्चा...

Aishwarya Rai ला उगाच नाही म्हणत बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री; आहे गडगंज संपत्तीची मालकीण
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 11:01 AM

मुंबई : 1 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. १९९४ मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंकर ऐश्वर्या हिने तिच्या करियरची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांना नाही तर, अनेक सेलिब्रिटींना देखील घायाळ केलं. आज ऐश्वर्या ५० वर्षांची झाली आहे. तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. ऐश्वर्या हिने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ऐश्वर्या हिला दोन वेळा फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ऐश्वर्या बॉलिवूडची दमदार अभिनेत्री तर आहेच, पण बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून देखील तिची ओळख आहे.

ऐश्वर्या राय हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे अनेक महागड्या गाड्या, बंगले आणि कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चन हिच्याकडे जवळपास ७७६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतील फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या हिची ओळख आहे.

ऐश्वर्या फक्त सिनेमांच्या माध्यमातून नाही तर, अनेक जाहिरातींच्या माध्यमातून देखील कोट्यवधींची माया कमावते. रिपोर्टनुसार, अभिनेत्री एका सिनेमासाठी तब्बल १० ते १२ कोटी मानधन घेते. तर जाहिरातींसाठी अभिनेत्री ६ ते ७ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेते..

अनेक महागड्या ब्रँडसोबत ऐश्वर्या करते काम

ऐश्वर्या राय टॉप ब्रँडसोबत काम करते. ऐश्वर्या L’Oreal आणि स्विस लक्झरी घड्याळ सारख्या महागड्या ब्रँडचा चेहरा आहे. यासोबतच अभिनेत्री लक्स, को-कोला, पेप्सी, टायटन वॉचेस, लॅक्मे, कॅसिओ पेजर, फिलिप्स, पामोलिव्ह, कॅडबरी, फुजी फिल्म्स, कल्याण ज्वेलर यासह अनेक ब्रँडसाठी काम करते.

ऐश्वर्या राय हिचे बंगले

ऐश्वर्या राय हिने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत अभिनेत्री ‘जलसा’ बंगल्यात राहाते. पण ऐश्वर्या हिच्याकडे स्वतःचा देखील आलिशान बंगला आहे. दुबईमध्ये ऐश्वर्या हिचा आलिशान व्हिला आहे. ज्याची किंमत १६ कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.

एवढंच नाही तर, ऐश्वर्या हिच्याकडे मुंबई येथील ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत जवळपास २० ते ३० कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. गडगंज संपत्तीची मालकीण ऐश्वर्या रॉयल आयुष्य जगते.

ऐश्वर्या कडे आहेत अनेक महागड्या गाड्या

ऐश्वर्या हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्यामध्ये रोल्स रॉयल घोस्ट, ऑडी ए 8 एल, मर्सिडीज बेंझ एस 500, मर्सिडीज बेंझ एस 350, लेक्सस एलएक्स 570 यांसारख्या अन्य महागड्या गाड्या आहेत. आज ऐश्वर्या हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.