भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री, सिनेमा नसताना देखील कशी कमावते कोट्यवधींची माया?
India's Richest Actress: भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, नेटवर्थ जवळपास 776 कोटी, 14 वर्षात एकटीने नाही दिला एकही हीट सिनेमा, तरी देखील आलिया - दीपिका यांच्यावर भारी... अभिनेत्री कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत... तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी...
चाहत्यांमध्ये कायम अभिनेत्रींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. सांगायचं झालं तर, सध्या बॉलिवूडवर अभिनेत्री दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कतरिना कैफ राज्य करत आहेत. तर साऊथ सिनेश्वात नयनतारा, अनुष्का शेट्टी आणि सामंथा रूथ प्रभू यांचा बोलबोला आहे. आलिया हिने गेल्या पाच वर्षात बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक सिनेमाला डोक्यावर घेतलं. पण यासर्व अभिनेत्रींमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जी अभिनय क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय नाही. 14 वर्षात अभिनेत्रीने एकटीने एकही सोलो सिनेमात काम केलं नाही. तरी देखील भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, करीना कपूर आणि प्रियंका चोप्रा भारतातील टॉप अभिनेत्री आहेत. ज्या एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेतात. नयनतारा हिची सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये गनणा होते. पण नयनतारा सर्वात श्रीमंत अभिनेत्री नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, तिने शेवटचा 2010 मध्ये एकल हिट सिनेमा दिला होता, परंतु संपत्तीच्या बाबतीत ती भारतातील शीर्ष अभिनेत्रींपेक्षाही पुढे आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या 14 वर्षांपासून या अभिनेत्रीने एकही हिट सिनेमा दिलेला नाही, तरीही 2000 च्या दशकाच्या मध्यापासून ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 776 कोटी रुपये आहे.
ऐश्वर्या हिने करियरच्या सुरुवातील अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं. ऐश्वर्या अनेक जाहिरातींमधून देखील कोट्यवधींची कमाई करते. शिवाय अनेक उद्योगांमध्ये देखील अभिनेत्रीने गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे ऐश्वर्या सिनेमांमध्ये काम न करून देखील कोट्यवधी रुपये कमावते.
ऐश्वर्या हिच्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. मीडिआ रिपोर्टनुसार, प्रियांका हिच्याकडे 600 कोटींची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांवर दीपिका पादुकोण आहे. दीपिका हिच्याकडे 550 कोटींची संपत्ती आहे. तर आलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आलिया हिच्याकडे 500 कोटींची संपत्ती आहे.
ऐश्वर्या गेल्या दोन दशकांपासून मोठ्या ब्रँड्सना एंडोर्स करून करोडो रुपये कमवत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेऊन अभिनेत्रीने जगभरात आपली खास ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.