ऐश्वर्या राय हिने सोडलं बच्चन कुटुंबाचं घर, पतीकडून घेणार घटस्फोट? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्यामध्ये दुरावा, बॉलिवूडमध्ये होणार आणखी एक घटस्फोट? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या नात्याची चर्चा...

ऐश्वर्या राय हिने सोडलं बच्चन कुटुंबाचं घर, पतीकडून घेणार घटस्फोट? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 11:46 AM

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये देखील सध्या फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, अभिषेक याने साखरपुड्याची अंगठी काढल्याची चर्चा देखील तुफान सुरु आहे. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन धरलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता, जवळच्या व्यक्तीकडून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या – अभिषेक यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं सध्या नाजूक वळनावर आहे. ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबाचं घर म्हणजे ‘जलसा’ सोडली आहे. अभिनेत्री आता आई आणि मुलीसोबत जगत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

ऐश्वर्या राय हिच्या सासूबाई आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे ऐश्वर्या हिने सासर सोडल्याची तुफान चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, दोन वर्षांपासून दोघींनी त्यांच्यामध्ये असलेले वाद आणि मतभेद मिटवण्याचे प्रयत्न देखील केले नाहीत. तर दुसरीकडे, अभिषेक बच्चन मुलगा आणि पती म्हणून स्वतःच्या जबाबदाऱ्या निभावण्यात अपयशी ठरला… अशी माहिती देखील समोर येत आहे. सध्या चर्चेत असलेल्या गोष्टींचा खुलासा झालेला नाही. ऐश्वर्या – अभिषेक यांनी रंगत असलेल्या चर्चांवर अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, ‘द अर्चिज’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी देखील संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं होतं. तेव्हा देखील ऐश्वर्या हिला पाहून जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांनी पाठ फिरवली.. अशा देखील अनेक चर्चा रंगल्या. नुकताच झालेल्या आराध्या हिच्या एनुअल डे कार्यक्रमात अभिषेक – ऐश्वर्या वेगळ्या कारमधून आले. पण आराध्या हिला घेऊन घरी परतत असताना मात्र ऐश्वर्या – अभिषेक लेकीसोबत एकत्र गेले..

ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं

सांगायचं झालं तर, गेल्या 16 वर्षांपासून ऐश्वर्या – अभिषेक एकत्र राहात आहेत. अनेक वर्ष ऐश्वर्या – अभिषेक यांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये मोठ्या थाटात ऐश्वर्या – अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.