Salman Khan : ‘ऐश्वर्या राय हिच्या लग्नानंतर मी…’, सलमान खान असं काय बोलून गेला?
Salman Khan : ऐश्वर्या राय - सलमान खान यांच्या जोडीला आजही नाही विसरले चाहते, 'ऐश्वर्या राय हिच्या लग्नानंतर मी...', अभिनेत्रीच्या लग्नानंतर असं का म्हणाला भाईजान? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा...
Salman Khan Love Life : ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमानंतर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यामध्ये प्रेम बहरलं. दोघांच्या प्रेमाची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, सोशल मीडियावर देखील रंगली होती. आज सलमान आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष उलटून गेली आहे. तरी देखील ऐश्वर्या राय – सलमान खान यांच्या जोडीला चाहते आजही विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर आज देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, आज देखील ऐश्वर्या राय – सलमान खान एकाच कार्यक्रमात आल्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगतात.
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय – सलमान खान कधीच एकत्र दिसले नाहीत. सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो तेव्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
दरम्यान, एका मुलाखतीत सलमान याने देखील ऐश्वर्या हिच्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं होतं. सलमान खान म्हणाला होता, ‘ऐश्वर्या हिचं आता लग्न झालं. प्रतिष्ठित कुटुंबातील मुलासोबत तिने लग्न केलं. अभिषेक चांगला मुलगा आहे. ऐश्वर्या आनंदी आहे आणि एक एक्स-बॉयफ्रेंडसाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे…’ ऐश्वर्या हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे सलमान खान कायम चर्चेत असतो.
रिपोर्टनुसार, सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिनेता विवेक ओबेरॉय याची एन्ट्री झाली. पण विवेक याच्यासोबत देखील ऐश्वर्या हिचं लग्न होऊ शकलं नाही. एवढंच नाही तर, विवेक करियर सलमान खान याच्यामुळे उद्ध्वस्त झालं असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.. विवेक याने देखील अनेकदा यावर मोठे खुलासे केले आहेत.
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन
सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्यासोबत नातं अपयशी ठरल्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिनेता अभिषेक बच्चन यांची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्रीने 2007 मध्ये कुटुंबिय आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत अभिषेक याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये आराध्या बच्चन हिला जन्म दिला.
लग्नानंतर ऐश्वर्या हिने बॉलिवूडला राम राम ठोकला. ऐश्वर्या आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण ऐश्वर्या सोशल माडियावर फक्त अभिषेक याला फॉलो करते.