PS-1: ऐश्वर्या रायचं दमदार कमबॅक; पहिल्याच दिवशी हृतिक रोशनला टाकणार मागे?

'विक्रम वेधा' बॉक्स ऑफिसवर आपटणार? पहा काय म्हणतायत ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे

PS-1: ऐश्वर्या रायचं दमदार कमबॅक; पहिल्याच दिवशी हृतिक रोशनला टाकणार मागे?
AishwaryaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 6:35 PM

मुंबई- बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होणार आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी हृतिक रोशन, सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट प्रदर्शित होतोय. याच दिवशी मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन: 1’ (Ponniyin Selvan: I) हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या दोन्ही चित्रपटांच्या ॲडव्हान्स बुकिंगचा (Advance Booking) आकडा थक्क करणारा आहे. शनिवारपासून या चित्रपटांच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. मणिरत्नम यांच्या ‘PS: 1’ या चित्रपटातून ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणार असल्याचं म्हटलं जातंय.

‘पोन्नियन सेल्वन 1’ हा पॅन इंडिया चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दक्षिणेच्या थिएटर्समध्ये या चित्रपटासाठी चांगली ॲडव्हान्स बुकिंग होत आहे. प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता थिएटर्स मालकांना मॉर्निंग शोज खुले करावे लागले. चेन्नईमध्ये सकाळी साडेचारच्या शोजची ॲडव्हान्स बुकिंग फुल झाली आहे. या चित्रपटाच्या बुकिंगचा आकडा हा सोमवारपर्यंत 1 लाख 75 हजारपर्यंत पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा

पोन्नियिन सेल्वन 1 आणि विक्रम वेधा यांच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या आकड्यात मोठा फरक पहायला मिळतोय. विक्रम वेधाच्या बुकिंगचा आकडा हा फक्त 17 हजारांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पीएस- 1 हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

PS-1 या चित्रपटात चियान विक्रम, त्रिशा, ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिका साकारणार आहे. 2018 मध्ये ती ‘फन्ने खान’ या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे आता चार वर्षांनंतर ऐश्वर्या दमदार कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जातंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.