ऐश्वर्या राय हिला ‘या’ मोठ्या गोष्टीची झाली जाणीव, अभिषेक बच्चनही..
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या पर्सनल लाईफमुळे तूफान चर्चेत दिसत आहे. ऐश्वर्या राय हिचे 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न झाले.
बाॅलिवूड अभिनेता ऐश्वर्या राय हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली नाहीये. ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मात्र, त्यावर कधीच बच्चन कुटुंबिय किंवा ऐश्वर्या राय आणि अभिषेकने काहीच भाष्य केले नाही. आज ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला तब्बल 17 वर्षे पूर्ण झालेत.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 20 एप्रिल 2007 मध्ये झाले. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनवर प्रेम करत आणि त्याच्यासोबत लग्नही झाले. मात्र, ज्यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे हनीमूनसाठी बोरा बोराच्या फ्लाईटमध्ये बसले, त्यावेळी तिला जाणीव झाली की, आपले लग्न झाले. त्याचा एक मोठा किस्सा आहे.
त्याचे झाले असे की, फ्लाईटमध्ये बसल्यावर तिला मिसेस बच्चन म्हणण्यात आले आणि त्यावेळी ऐश्वर्या रायला जाणीव झाली की, आपले लग्न झाले. यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे एकमेकांकडे बघू हासले. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
ऐश्वर्या राय हिने अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले. ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या राय ही अभिनयासोबतच जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये कमावते. ऐश्वर्या राय हिची संपत्ती अभिषेक बच्चन याच्यापेक्षाही जास्त असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचे नाव आराध्या असून अनेकदा ती आई वडिलांसोबत स्पाॅट होताना दिसते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांकडून कधीच काही भाष्य करण्यात नाही आले.