ऐश्वर्या – आराध्याचा ‘तो’ व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, ‘किमान अभिषेकने तरी दोघींसोबत…’
Aishwarya Rai and Abhishek Bachchan Marriage: अभिषेक बच्चन याने सोडली पत्नी ऐश्वर्या आणि लेक आराध्या यांची साथ? व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले 'किमान अभिषेकने तरी दोघींसोबत...', अंबानींच्या लग्नामुळे बच्चन कुटुंब चर्चेत...
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून तुफान सुरु आहे. दोघे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत… पण बच्चन कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचत नसल्याचं देखील चाहत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, ऐश्वर्या राय आणि लेक आराध्या बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघींसोबत अभिषेक नसल्यामुळे चाहत्यांनी देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. सध्या सर्वत्र ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या मुलाचं लग्न राधिका मर्चंट यांच्यासोबत लग्न झालं. लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र होतं. पण ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत वेगळी लग्नात सामिल झाली. सध्या सोशल मीडियावर आराध्या आणि ऐश्वर्या यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
बच्चन कुटुंबियांना एकत्र आणि ऐश्वर्या – आराध्या यांना वेगळं पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडीओवर चाहते कमेंट करत नाराजी व्यक्त करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘बच्चन असल्यामुळे ऐश्वर्याने लग्न केलं, पण आता बच्चन पासून वेगळी राहाते…’
दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘किमान अभिषेकने तरी दोघींसोबत असायला हवं होतं…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या लग्नात कुटुंबासोबत सामिल का नाही झाली?’ असे अनेक प्रश्न चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. सध्या सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या कायम आई आणि लेकीसोबत फोटो पोस्ट करत असते. कोणत्याच फोटोमध्ये अभिषेक आणि बच्चन कुटुंब नसतं. गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याच्या चर्चा सुरु आहेत. पण याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.