ऐश्वर्या रायने लग्नाआधी आई होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा…, जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

Aishwarya Rai viral Video: लग्नाआधी ऐश्वर्या राय हिने व्यक्त केली होती आई होण्याची इच्छा, अभिनेत्रीला हवं होतं स्वतःचं बाळ, अनेक वर्षांपूर्वी म्हणाली होती..., गेल्या काही दिवसांपासून रंगतीये ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... व्हिडीओ तुफान व्हायरल...

ऐश्वर्या रायने लग्नाआधी आई होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा..., जुना व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 8:56 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवाय बच्चन कुटुंबातील काही सदस्यांसोबत देखील ऐश्वर्याचे मतभेद आहेत… असं देखील सांगण्यात येत आहे. पण यावर कोणीही अधिकृत घोषणा केली नाही. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना, सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या एक इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. ऐश्वर्या रायचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या राय हिचा व्हिडीओ करियर सुरु होण्याआधीचा आहे. जेव्हा ऐश्वर्या हिने 1994 मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. व्हिडीओमध्ये अभिनेते एम एम फारुकी, अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची मुलाखत घेताना दिसत आहेत. एम एम फारुकी यांनी मुलाखतीत ‘तुझ्या आयुष्यातील न विसरता येणारा क्षण कोणता आहे?’ असा प्रश्न ऐश्वर्याला विचारला.

एम एम फारुकी यांच्या प्रश्नाचं उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली, ‘न विसरता येणारा क्षण माझ्या आयुष्यात येणार आहे. जेव्हा मला बाळ होईल..’ मुलाखतीत आई होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ऐश्वर्या चेहऱ्यावर हात ठेवून हसू लगली. तेव्हा जमलेल्या सर्वांना टाळ्या वाजवल्या. तेव्हा ऐश्वर्या हिने व्यक्ती केलेली इच्छा काही वर्षांनंतर पूर्ण झाली.

ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चन

ऐश्वर्या राय हिने अनेक वर्ष अभिषेक बच्चन याला डेट केल्यानंतर 2007 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या आता 13 वर्षांची झाली आहे. कोणत्या कार्यक्रमात ऐश्वर्या कायम लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचत असते.

सांगायचं झालं तर, कोणत्याही मुलाखतीत ऐश्वर्या कायम लेक आराध्या हिच्याबद्दल बोलताना दिसते. सोशल मीडियावर देखील दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय, आराध्या हिचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे. आराध्या हिच्यासोबत ऐश्वर्या देखील जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.