ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटावर ऐश्वर्याच्या भावजयचे सूचक विधान, थेट म्हणाली, ते कधीच एकत्र…

ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याचे सतत सांगितले जात आहे. घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. मात्र, यावर अजूनही काही खुलासा हा करण्यात नाही आला.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटावर ऐश्वर्याच्या भावजयचे सूचक विधान, थेट म्हणाली, ते कधीच एकत्र...
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 7:59 PM

मुंबई : ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सतत सांगितले जातंय. मात्र, ऐश्वर्या राय किंवा अभिषेक यांच्याकडून याबद्दल अजिबातच भाष्य करण्यात येत नाहीये. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगण्यात आले. ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरात शिफ्ट झालीये, असे रिपोर्टमध्ये सांगितले गेले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हा टोकाला गेलाय. मात्र, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता ऐश्वर्या राय हिच्या भावाची बायको श्रीमा राय हिने मोठे विधान केले आहे. ऐश्वर्या राय हिची भावजय श्रीमा राय सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नुकताच श्रीमा राय हिने मोठा खुलासा केला आहे. आता श्रीमा राय हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

श्रीमा राय म्हणाली की, मी कधीच ऐश्वर्या राय हिला एक सुपरस्टार म्हणून अजिबातच बघत नाही. माझ्यासाठी ती कायमच माझी ननंद आहे. मुळात म्हणजे माझ्यामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये कधीच कामाचे काहीच बोलणे होत नाही. मुळात म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घरी फार कमी येतात. परंतू त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवायला आवडतो.

आता तर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन हे एकसोबत भेटतच नाहीत. जेंव्हा ऐश्वर्या येते त्यावेळी मी कामात असते. आता ऐश्वर्या राय हिच्या भावजयच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरच घटस्फोट घेणार का हा प्रश्न चाहते सतत विचारताना दिसत आहेत. मात्र, याबद्दल खुलासा होऊ शकत नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा करताना श्वेता बच्चन ही दिसली होती. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयीबद्दल बोलताना श्वेता बच्चन ही दिसली होती.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.