Nysa Devgan | ‘ही नेहमी नशेतच असते का?’; अजय देवगणची लेक पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

'ही नेहमीच नशेत का असते', असा सवाल एकाने केला. तर 'हीचं नाव निसा नाही तर नशा ठेवायला पाहिजे होतं', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. 'निशा तिच्या आईवर गेली आहे, काजोलसुद्धा नेहमीच धडपडत असते', असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.

Nysa Devgan | 'ही नेहमी नशेतच असते का?'; अजय देवगणची लेक पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
न्यासा देवगणImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 2:57 PM

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा देवगण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. निसाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पार्टीनंतर एका क्लबमधून बाहेर पडताना दिसत आहे. मात्र कारच्या दिशेने चालताना तिचा तोल जातो आणि ती धडपडते. या व्हिडीओवरून निसाला जोरदार ट्रोल केलं जातंय. निसा नेहमीच दारूच्या नशेत असते, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

‘ही नेहमीच नशेत का असते’, असा सवाल एकाने केला. तर ‘हीचं नाव निसा नाही तर नशा ठेवायला पाहिजे होतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘निशा तिच्या आईवर गेली आहे, काजोलसुद्धा नेहमीच धडपडत असते’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे. निसाचा असा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही पार्टीतून बाहेर आल्यानंतर अशाच पद्धतीने धडपडतानाचा तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता.

हे सुद्धा वाचा

याआधी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती कारचा दरवाजा उघडून बाहेर पडताना दिसते. त्यानंतर ती अचानक उडी मारते आणि समोर असलेल्या सुरक्षारक्षकाला तिचा हलका धक्का लागतो. निसाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. ‘या मुलीमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘ही पूर्ण वेळ नशेतच असते का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला होता. ‘निसा नेहमीच कुठे ना कुठे धडपडत असते’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.

निसा अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वेदांत महाजन असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. खास मित्र ओरहान अवत्रमणी आणि बॉयफ्रेंड वेदांतसोबत निसाने लंडनमध्ये प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती.

कोण आहे वेदांत महाजन?

गेल्या काही महिन्यांपासून निसा ही 25 वर्षीय वेदांत महाजन या तरुणाला डेट करत असल्याचं समजतंय. मात्र याबद्दल तिने अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नाही. वेदांत हा कमी वयात यशस्वी व्यावसायिक ठरला आहे. तो मूळचा दिल्लीचा असून विविध बॉलिवूड पार्ट्यांचं आयोजन तो करतो. त्याने आपल्या कंपनीची सुरुवात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी न्यू-इअर पार्टीचं आयोजन करून केली होती. यासोबतच तो लंडनमधील UCL मध्ये शिक्षणसुद्धा घेत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.