अजय देवगणचा वडिलांबद्दल मोठा खुलासा.. 13 व्या वर्षी घरातून पळाले आणि बनले गँगस्टर,

अभिनेता अजय देवगणनेही रोहित शेट्टीसोबत दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोहजेरी लावली

अजय देवगणचा वडिलांबद्दल मोठा खुलासा.. 13 व्या वर्षी घरातून पळाले आणि बनले गँगस्टर,
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 3:25 PM

मुंबई | 21 डिसेंबर 2023 : दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो सध्या खूप गाजतोय. दीपिका-रणवीर, कियारा अडवाणी, विकी कौशल, आलिया भट्ट, करीना कपूर यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी या शोच्या आठव्या सीझनला हजेरी लावली, त्यांच्या वक्तव्याची बरीच चर्चाही झाली. या बहुचर्चित शोमध्ये नुकताच अभिनेता अजय देवगणनेही रोहित शेट्टीसोबत हजेरी लावली. त्यावेळी गप्पा मारताना अजयने त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच त्यांच्याबद्दल अनेक आश्चर्यकारक खुलासेही केले. ॲक्शन डिरेक्टर बनण्यापूर्वी एकेकाळी वीरू देवगण गली गँगचे मेंबर होतं, त्यांनी अनेक चकमकीतही भाग घेतल्याचे त्याने सांगितले. मात्र एका मोठ्या दिग्दर्शकामुळे त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली, हे अजयने नमूद केलं.

घरातून पळाले होते वीरू देवगण

अजयचे वडील वीर देवगण हे बॉलिवूडमधील नामवंत ॲक्शन डिरेक्टर होते. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी ॲक्शन सीन्स डिरेक्ट केले होते. मात्र वीरू देवगण यांच बालपण खूप खडतर होतं. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ते पंजाबमधील घरातून पळून गेले. रेल्वेचं तिकीट न काढताच ते मुंबईत आले आणि पकडले गेले. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही घडला. त्यांच्या हातात काही काम नसल्याने दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची.

मात्र एके दिवशी एका व्यक्तीने त्यांना मदत करण्यासा सांगितले. जर तू माझी कार धुवून साफ केलीस तर तू त्यामध्ये झोपू शकतोस, असे वीरू देवगण यांना सांगण्यात आले. तिथूनच त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला.

त्यानंतर वीरू हे कार्पेंटर बनले आणि सायन-कोळीवाडा भागातील गँगस्टर्सपैकी एक बनले. त्यांची एक गँगही होती, त्या काळात बरीच गँगवॉर्स (टोळीयुद्ध) व्हायची, त्यात ते ( वीरू देवगण) सहभागी व्हायचे. मात्र अजयच्या तोंडून हा किस्सा ऐकून करण जोहर तर हैराणच झाला.

असे बदलले वीरू देवगण यांचे आयुष्य

एकदा खूप मोठे दिग्दर्शक, श्री रवी खन्ना त्या भागातून जात होते, तेव्हा रस्त्यावर बराच वेळ मारामारी सुरू होती. तेव्हा त्यांनी कार थांबवली आणि वीरू देवगण यांना जवळ बोलावले. ‘तू काय करतोस ?’ असं त्यांनी वीरू यांना विचारल्यावर आपण कार्पेंटर म्हणून काम करत असल्याचं सांगितले. तेव्हा रवी खन्ना यांनी खूप चांगली लाईन त्यांना सांगितली, ते म्हणाले ‘तू खूप चांगला लढतोस (मारामारी करतोस), मला उद्या येऊन भेट.’ त्यानंतर माझे वडील त्यांना जाऊन भेटले आणि तिथूनच ते फायटर बनले. ॲक्शन डिरेक्टर बनण्याचा प्रवास, त्या प्रसंगापासून सुरू झाल्याचे अजयने नमूद केले.

वीरू देवगण यांनी 200 हून अधिक चित्रपटात ॲक्शन सीन्स डायरेक्ट केले. त्यामध्ये रोटी कपड़ा और मकान, मिस्टर नटवरलाल, फूल और कांटे , आणि राम तेरी गंगा मैली अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.

अजयचे आगामी चित्रपट

अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. पुढल्या वर्षी तो चित्रपट रिलीज होईल. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यामध्ये अजय व्यतिरिक्त रणवीर सिंग, करीना कपूर खान, अक्षय कुमार यांचीही भूमिका आहे. सिंघम फ्रँचायझीची सुरूवात 2011 मध्ये झाली, ज्यात अजयने मुख्य भूमिका साकारली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.