तुझी मुलं दहशतवादी बनतील..; दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने अजय देवगणची हिरोइन ट्रोल

शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीला दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

तुझी मुलं दहशतवादी बनतील..; दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने अजय देवगणची हिरोइन ट्रोल
अभिनेत्री प्रियामणीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 9:07 AM

काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र सोनाक्षीच्या आधी असे इतरही काही कलाकार आहेत, ज्यांना दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला. यात अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत काम केलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीचाही समावेश होतो. शाहरुख खानसोबत तिने ‘जवान’ या चित्रपटात काम केलं, तर अजय देवगणसोबत तिने ‘मैदान’मध्ये भूमिका साकारली होती. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधूनही तिला चांगली लोकप्रियता मिळाली. मात्र प्रियामणी तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. 2016 मध्ये तिने मुस्तफा राजशी साखरपुडा करत असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणी याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणीने खुलासा केला की लोक तिला जिहादबद्दल मेसेज करायचे आणि म्हणायचे की तिची मुलं दहशतवादी बनतील. याविषयी ती पुढे म्हणाली, “लोक मला मेसेज करायचे आणि म्हणायचे की, जिहाद, मुस्लीम, तुझी मुलं दहशतवादी बनतील. हे खूप निराशाजनक आहे. दुसऱ्या धर्मात लग्न करणाऱ्यांवर का निशाणा साधायचा? असे अनेक आघाडीचे अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या धर्माबाहेर, जातीबाहेर जाऊन लग्न केलं. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी आपला धर्म सोडला. या गोष्टीवरून इतका द्वेष का आहे, तेच मला समजत नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

प्रियामणीने ईदनिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. तेव्हासुद्धा तिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. “लोकांनी प्रश्न विचारला की मी नवरात्रीनिमित्त का पोस्ट शेअर केली नाही. यावर कसं उत्तर द्यावं हेच मला कळत नाही. पण मला आता या गोष्टींचा फारसा फरक पडत नाही. अशा नकारात्मकतेकडे अधिक लक्ष न देण्याचा निर्णय मी घेतला आहे”, असं तिने स्पष्ट केलं.

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणी म्हणाली होती, “खरं सांगायचं झालं तर माझ्यावर किंवा माझ्या आईवडिलांवर आता ट्रोलिंगचा अजिबात परिणाम होत नाही. आम्ही दोघं ज्यावेळी एकमेकांना डेट करत होतो, तेव्हासुद्धा मला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. आम्ही एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचं पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे या वाटेत कोणतंही वादळ आलं तरी आम्ही त्याला एकत्र सामोरं जाणार होतो. मला इतका समजूतदार पार्टनर मिळाल्याने मी खूप खुश आहे.”

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.