हा तर ज्युनिअर अजय देवगणच; युगच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

'शैतान'च्या प्रीमिअरला जयदीप अहलावत, कार्तिक आर्यन, राजकुमार हिरानी, टी-सीरिजचे मालक भूषण कुमार, आनंद एल. राय, रवी दुबे, तुषार कपूर, डेझी शाह हे कलाकारसुद्धा पोहोचले होते. या प्रीमिअरमध्ये अजय देवगण आणि त्याचा मुलगा युगने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

हा तर ज्युनिअर अजय देवगणच; युगच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Ajay Devgn with son YugImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 10:38 AM

मुंबई : 8 मार्च 2024 | अजय देवगण आणि आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘शैतान’ हा चित्रपट आज (8 मार्च) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याआधी गुरुवारी रात्री या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रीमिअरला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित होते. ‘शैतान’ या चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्स प्रीमिअरला आवर्जून हजर होते. अशातच सर्वांचं लक्ष एका मुलाकडे वेधलं गेलं. हा मुलगा होता युग देवगण. अजय देवगणने या प्रीमिअरला युगसोबत एण्ट्री केली. युग आणि अजयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

‘शैतान’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका उपस्थित होते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी प्रीमिअरचं आयोजन केलं होतं. प्रीमिअरला अजय जेव्हा मुलगा युगसोबत आला, तेव्हा सर्वांच्या नजरा दोघांवर खिळल्या होत्या. काही व्हिडीओंमध्ये युग अगदी त्याच्या वडिलांसारखाच पोझ देताना दिसला. फोटो क्लिक करताना अजय त्याच्यासोबत गप्पासुद्धा मारतो. बापलेकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

‘हा ज्युनिअर अजय देवगणच आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हा तर अजय देवगणची हुबेहूब कॉपीच आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. युग हा थोडाफार तरुणपणीच्या सलमान खानसारखा दिसतोय, असंही काहींनी म्हटलंय. अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांना निसा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. सोशल मीडियावर अनेकदा अजय त्याच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो पोस्ट करत असतो.

एका मुलाखतीत अजय त्याच्या मुलांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगविषयी व्यक्त झाला होता. “मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावतो की ऑनलाइन लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असते, हे मी त्यांना सांगतो”, असं अजय म्हणाला होता. “मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो”, असंही तो पुढे म्हणाला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.