Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bholaa Vs Dasara | अजय देवगणचा ‘भोला’ पहायचा की नानीचा ‘दसरा’? संभ्रमात असाल तर आधी कमाई पहा!

‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत.

Bholaa Vs Dasara | अजय देवगणचा 'भोला' पहायचा की नानीचा 'दसरा'? संभ्रमात असाल तर आधी कमाई पहा!
Bholaa and DasaraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 9:50 AM

मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये टक्कर पहायला मिळतेय. यातील पहिला चित्रपट हा बॉलिवूडच्या अजय देवगणचा आहे तर दुसरा साऊथ सुपरस्टार नानीचा आहे. भोला आणि दसरा हे दोन्ही चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाले. त्यामुळे बॉक्स ऑफिस कमाईबाबत या दोन्ही चित्रपटांची तुलना केली जातेय. ‘दृश्यम 2’नंतर अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. मात्र कमाईच्या बाबतीत नानीच्या ‘दसरा’ने पहिल्या तीन दिवसांत ‘भोला’ला मात दिली आहे. या दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात..

अजय देवगणच्या ‘भोला’ने पहिल्या दोन दिवसांत 18.60 कोटी रुपयांची कमाई केली. तर नानीच्या ‘दसरा’ने 32.95 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 11.20 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 7.40 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये कमावले. दुसरीकडे ‘दसरा’ने पहिल्या दिवशी 23.2 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 9.75 कोटी रुपये आणि दिसऱ्या दिवशी 13 कोटी रुपये कमावले.

‘भोला’ची ही कमाई ‘दृश्यम 2’च्या तुलनेत कमी आहे. दृश्यम 2 ने पहिल्या दिवशी जवळपास 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र वीकेंडदरम्यान भोलाच्या कमाईत चांगली वाढ होऊ शकते असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. भोलाचा बजेट 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातंय.

हे सुद्धा वाचा

‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, आमला पॉल, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि कैदी भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते.

दुसरीकडे ‘दसरा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं आहे. यामध्ये दारूचा व्यापार, गावातील राजकारण, जातपात, मैत्री आणि प्रेम कहाणी या सर्वांचं मिश्रण पहायला मिळतंय. या चित्रपटात नानीसोबत किर्ती सुरेशची मुख्य भूमिका आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.