Nysa Devgn: पू बनी पार्वती.. अजय देवगणच्या मुलीला पूर्ण कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

Year End पार्टीमधील बोल्ड अंदाजानंतर न्यासा दिसली मंदिरात; काजोलची मुलगी 'या' कारणामुळे पुन्हा झाली ट्रोल

Nysa Devgn: पू बनी पार्वती.. अजय देवगणच्या मुलीला पूर्ण कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स
Year End पार्टीमधील बोल्ड अंदाजानंतर न्यासा दिसली मंदिरातImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 2:21 PM

मुंबई: बॉलिवूड स्टारकिड्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सारा अली खान, जान्हवी कपूर, न्यासा देवगण, अनन्या पांडे हे स्टारकिड्स विविध पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. वर्षाच्या अखेरीस या स्टारकिड्सची जोरदार पार्टी झाली होती आणि या पार्टीत सर्वाधिक लक्ष वेधलं होतं अजय देवगण आणि काजोलच्या मुलीने. पार्टीतील न्यासाचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले होते. आता पुन्हा एकदा न्यासा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिला कुठल्याही पार्टीत नाही तर मंदिराबाहेर पाहिलं गेलं.

गेल्या काही महिन्यांत न्यासा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. न्यासा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातील न्यासाने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बॅक-टू-बॅक पार्टी केली.

हे सुद्धा वाचा

या पार्टीतील तिचे लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकतीच ती सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली. यावेळी तिच्यासोबत अजय देवगण आणि आई काजोलसुद्धा होती. न्यासाने यावेळी पांढऱ्या रंगाचा सलवार-सूट परिधान केला होता.

तिचा असा अंदाज पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला पुन्हा ट्रोल केलंय. ‘पू बनी पार्वती’ या काजोलच्या प्रसिद्ध डायलॉगने न्यासाची खिल्ली उडवली गेली. ‘नवीन वर्षाच्या पार्टीत खूप धमाल केली, आता बॉलिवूडमध्ये लाँच होण्याआधी थोडी तरी नीट वाग- असं काजोल म्हणाली असेल’, अशीही कमेंट एका युजरने केली. ’31 डिसेंबरच्या पार्टीनंतर काजोलची इच्छा नाही की तिने ओरहानसोबत राहिलं पाहिजे. कारण त्यामुळे देवगण कुटुंबाची प्रतिमा मलिन होतेय’, असंही नेटकऱ्याने म्हटलंय.

न्यू इअर पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नव्हता. ‘हिने आईवडिलांचं नावच खराब केलं’, अशी टीका एका युजरने केली होती. तर ‘ही पूर्ण नशेतच आहे वाटतं’ असं दुसऱ्याने लिहिलं होतं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.