‘तुझी संपत्ती चोरली नाही…’, चाहत्याचा रागात हात झटकल्यामुळे Ajay Devgn ट्रोल; पाहा व्हिडीओ
अजय देवगण याला पाहिल्यानंतर त्याच्या भोवती जमली चाहत्यांची गर्दी; पण अभिनेत्याकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहिल्यानतंर तुम्हीही म्हणाल...
मुंबई : अभिनेता अजय देवगण कायम त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. चाहते अजयच्या नवीन सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. एवढंच नाही तर, अजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं. २ एप्रिल रोजी अभिनेत्याने स्वतःचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. याचदरम्यान, मुंबई येथील अजयच्या घाराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहत्यांनी अभिनेत्या भोवती गर्दी केली. पण चाहत्यांना पाहिल्यानंतर अभिनेत्याकडून अशा वागणुकीची अपेक्षा कोणालाच नव्हती. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजयने चाहत्यांसोबत केलेली वागणूक कैद झाली आहे.
रविवारी अजयला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमली. अजयला पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी अभिनेत्यासोबत सेल्फी देखील क्लिक केली. यावेळी एका चाहत्याने अजयचा हात धरला. चााहत्यांने हात पकडल्यामुळे अभिनेता संतापला आणि त्याने चाहत्याचा हात रागात झटकला. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेकऱ्यांनी अजय देवगण याला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘फक्त तुझा हात पकडला होता, तुझी संपत्ती घेतली नव्हती…’, अन्य एक युजर म्हणाला,’भोला सिनेमावर बहिष्कार टाका, डोकं ठिकाण्यावर येईल…’, तर तिसरा युजर म्हणाला, ‘ही लोक कधीच चाहत्यांचा उत्साह समजू शकणार नाहीत…’ व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अजयचा ‘भोला’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला चाहत्यांची पसंती देखील मिळाली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन देखील अजयनेच केलं आहे. ‘भोला’ सिनेमानंतर अभिनेता ‘मैदान’सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचं टिझर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. टिझरला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली.
सध्या अभिनेता ‘भोला’ सिनेमासाठी चर्चेत आहे. अभिनेत्याचा भोला सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे येत्या दिवसांत अजय देवगण स्टारर ‘भोला’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा आहे. कारण आज अजय मोठ्या थाटात स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहे.
अजय कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अजय कायम आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत दिसतो. शिवाय अभिनेत्याची मुलगी न्यासा देवगण देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.