Ajay Devgn | “घरातील सर्व निर्णय कोण घेतं?”, काजोलसमोर अजय देवगणने दिलं भन्नाट उत्तर; पहा व्हिडीओ

वेब सीरिजशिवाय काजोल लवकरच नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटातही झळकणार आहे. सुजॉय घोष, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि अमित आर. शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या विविध कथा या एका चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

Ajay Devgn | घरातील सर्व निर्णय कोण घेतं?, काजोलसमोर अजय देवगणने दिलं भन्नाट उत्तर; पहा व्हिडीओ
Kajol and Ajay DevganImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 11:05 AM

मुंबई : अभिनेत्री काजोल लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘द ट्रायल’ या आगामी सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारत असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सीरिजच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात काजोलचा पती अजय देवगण प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. यावेळी अजय आणि काजोलने काही प्रश्नांची मजेशीर उत्तरंसुद्धा दिली. घरातील सर्व निर्णय कोण घेतं, असा प्रश्न विचारल्यावर अजयने भन्नाट उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सोमवारी 12 जून रोजी काजोलच्या ‘द ट्रायल’ या पहिल्यावहिल्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या कोर्टरुम ड्रामामध्ये काजोलने नोयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारली आहे. स्कँडलमुळे पतीला अटक झाल्यानंतर ती वकिल म्हणून पुन्हा कामावर परतते आणि त्यानंतर पुढे काय घडतं, याची कथा सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

“काजोलच्या रिल आणि रिअल कॅरेक्टरमध्ये काही साम्य आहे का? घरातील महत्त्वपूर्ण निर्णय कोण घेतं? तू की काजोल”, असा प्रश्न ट्रेलर लाँचदरम्यान अजयला विचारण्यात आला होता. त्यावर अजय उत्तर देण्याआधीच काजोल म्हणते, “अजिबात नाही, याचं उत्तर मी देते.” यावेळी तिच्या बाजूलाच बसलेला अजय मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला विचारतो, “तुमचं लग्न झालंय का?” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. “तर मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हीसुद्धा देऊ शकता. ज्यांचं लग्न झालंय ते सर्वजण याचं उत्तर देऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर एकच असेल. प्रत्येक जण याचं उत्तर एकसारखंच देईल”, असं अजय पुढे म्हणतो.

अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. 1999 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर 2003 मध्ये काजोलने निसाला जन्म दिला. काजोल आणि अजयला युग नावाचा एक मुलगासुद्धा आहे. 2010 मध्ये काजोलने युगला जन्म दिला.

वेब सीरिजशिवाय काजोल लवकरच नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटातही झळकणार आहे. सुजॉय घोष, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि अमित आर. शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या विविध कथा या एका चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

1992 पासून काजोल बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करतेय. तिने ‘बेखुदी’ या चित्रपटातून पदार्पण केलं. तिची आई तनुजा आणि काकी नुतन यासुद्धा अभिनेत्री आहेत. काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे दिग्दर्शक आणि निर्माते होते. तर तिची छोटी बहीण तनिषा मुखर्जीसुद्धा अभिनेत्री आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.