Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nyasa Devgn | पार्टीनंतर दारूच्या नशेत दिसली अजय देवगणची लेक? नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार

शॉर्ट ड्रेस आणि हाय हिल्स असा न्यासाचा पार्टीतील लूक होता. गाडीतून उतरताच ती पापाराझींकडे पाहून स्मितहास्य करते आणि पुढे चालू लागते. मात्र चालतानाच ती थोडी डगमगताना दिसते. आणखी एका व्हिडीओमध्ये ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसतेय.

Nyasa Devgn | पार्टीनंतर दारूच्या नशेत दिसली अजय देवगणची लेक? नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार
Nysa DevgnImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 11:31 AM

मुंबई: बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल यांना सहसा इंडस्ट्रीतील कोणत्याच पार्ट्यांमध्ये पाहिलं जात नाही. अजय आणि काजोल हे बॉलिवूड पार्ट्यांपासून नेहमी दूरच असतात. मात्र त्यांची मुलगी न्यासा ही नेहमीच तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसते. नुकतीच ती बी-टाऊनमधल्या कलाकारांसोबत आणि इतर स्टारकिड्ससोबत एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. मात्र यावेळी तिच्या चालण्याची पद्धत पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

एकीकडे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. तर दुसरीकडे न्यासा, आर्यन खान, सुहाना खान, शनाया कपूर, अनन्या पांडे यांनी एकत्र पार्टी केली. या पार्टीनंतरचा न्यासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

या व्हायरल व्हिडीओमध्ये न्यासा एका गाडीतून उतरताना दिसत आहे. मात्र गाडीतून उतरल्यानंतर ती ज्या पद्धतीने चालते, ते पाहून ती नशेत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

पार्टीला जातानाचा व्हिडीओ

शॉर्ट ड्रेस आणि हाय हिल्स असा न्यासाचा पार्टीतील लूक होता. गाडीतून उतरताच ती पापाराझींकडे पाहून स्मितहास्य करते आणि पुढे चालू लागते. मात्र चालतानाच ती थोडी डगमगताना दिसते. आणखी एका व्हिडीओमध्ये ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसतेय. मात्र यावेळी चालताना बॉडीगार्ड तिची मदत करतो. कारमध्ये बसल्यानंतर तिचे हावभाव पाहून न्यासा नशेत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

पार्टीतून येतानाचा व्हिडीओ

या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये काहींनी न्यासाला तिच्या कपड्यांवरून तर काहींनी तिच्या दिसण्यावरून ट्रोल केलंय. ती पूर्णवेळ नशेतच होती, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

गेल्या काही महिन्यांत न्यासा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. न्यासा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातील न्यासाने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बॅक-टू-बॅक पार्टी केली होती. न्यू इअर पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नव्हता.

‘न्यासाने आईवडिलांचं नावच खराब केलं’, अशी टीका एका युजरने केली होती. तर ‘ही पूर्ण नशेतच आहे वाटतं’ असं दुसऱ्याने लिहिलं होतं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.