Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn | अजय देवगणने शेअर केला काजोलसोबतचा खास फोटो; ‘या’ कारणामुळे नेटकरी करतायत ट्रोल

याच फोटोवरून काही नेटकरी काजोलवर निशाणा साधत आहे. यामागचं कारण म्हणजे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाविषयी केलेलं वक्तव्य.

Ajay Devgn | अजय देवगणने शेअर केला काजोलसोबतचा खास फोटो; 'या' कारणामुळे नेटकरी करतायत ट्रोल
Ajay Devgn and KajolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 8:59 AM

लंडन | 18 जुलै 2023 : अभिनेत्री काजोलची ‘द ट्रायल’ ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतींमध्ये काजोलने अशी काही वक्तव्ये केली, ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आता अजय देवगणने नुकताच सोशल मीडियावर संपूर्ण कुटुंबासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून नेटकरी पुन्हा एकदा काजोलला ट्रोल करत आहेत. अजय आणि काजोल लंडनला कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी निसा आणि मुलगा युगसुद्धा होता. लंडनमधल्या ‘फॅमिली लंच’चा खास फोटो अजयने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यामध्ये त्यांच्यासोबत बहिणीचा मुलगा दानिश गांधीसुद्धा पहायला मिळतोय.

अजयने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये संपूर्ण देवगण कुटुंब आनंदी दिसत असून सेल्फीसाठी हसत पोझ देत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अजयने कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याविषयी समाधान व्यक्त केलं आहे. काजोलनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अजयची पोस्ट शेअर केली आहे आणि त्यावर लिहिलं, ‘आठवणींना रेकॉर्ड करणं गरजेचं असतं.’ मात्र याच फोटोवरून काही नेटकरी काजोलवर निशाणा साधत आहे. यामागचं कारण म्हणजे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाविषयी केलेलं वक्तव्य.

हे सुद्धा वाचा

काजोलने शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाविषयी असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे किंग खानचे चाहते तिच्यावर चांगलेच भडकले होते. ‘पठाण’चं खरं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालं, असा सवाल तिने शाहरुखला केला होता. त्यामुळे तिने शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईवरच थेट निशाणा साधला होता. या ट्रोलिंगनंतर आता अजयने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे, असं काही नेटकरी म्हणत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

नेमकं काय घडलं?

‘द ट्रायल’ या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत काजोलला विचारण्यात आलं की जर तिला शाहरुखला एखादा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर ती कोणता प्रश्न विचारणार? त्यावर काजोल म्हणाली, “त्याला मी काय विचारणार? त्याचं सर्व काही सोशल मीडियावर स्पष्ट आहे.” त्यानंतर थोडा विचार करून काजोल मजेशीर अंदाजात पुढे म्हणते, “मी विचारेन की मला खरं खरं सांग की तुझ्या ‘पठाण’ या चित्रपटाने किती कमाई केली होती?” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.