मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. लेकीच्या निधनानंतर आई मधू दुबे यांनी मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आकांक्षाच्या आईने बॉयफ्रेंड समर सिंह आणि भाऊ संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले असून दोघांवर तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. वाराणसीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे आणि मुख्यालय यांनी दिलेल्या माहितीनूसार, आकांक्षाच्या आईने लेखी तक्रार दिली आहे. ज्यामुळे समर सिंह आणि भाऊ संजय सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
लेकीच्या निधनानंतर मधू दुबे मध्यांसोबत संवाद साधताना म्हणाल्या, ‘समर सिंह माझ्या मुलीला गेल्या तीन वर्षांपासून त्रास देत होता. त्याने आकांशाला २१ तारखेला धमकी दिली होती. तुली गायब करेल, संपवेल.. तू मला ओळखत नाही.. त्यानंतर २२ तारखेला माझी मुलगी बनारसमध्ये आली आणि त्याने माझ्या लेकीला संपवलं…’
पुढे मधू दुबे म्हणाल्या, ‘आकांशा गेल्या तीन वर्षांपासून समर सिंह याच्यासोबत काम करत आहे. दोघांनी एकत्र अनेक अल्बम देखील केले आहेत. त्याने माझ्यामुलीचे पैसे देखील दिलेले नाही. एका अल्बमसाठी ७० हजार रुपये मिळायचे. समरने माझ्या मुलीचे जवळपास २ ते ३ कोटी रुपये दिलेली नाहीत.’ असे गंभीर आरोप मधू दुबे यांनी लेकीचा बॉयफ्रेंड समर सिंह याच्यावर केले आहेत.
अभिनेत्रीच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिवाय अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी आकांक्षा दुबे (akanksha dubey) ला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. मेरी जंग मेरा फैसला सिनेमातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
मेरी जंग मेरा फैसला सिनेमातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
सध्या सर्वत्र आकांक्षा हिच्या निधनाची आणि तिच्या आईने बॉयफ्रेंड समर सिंह याच्यावर केलेल्या आरोपांची चर्चा रंगत आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या निधनानंतर आणि समर सिंह याच्यावर आईने लावलेल्या गंभीर आरोपांनंतर याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.