Akanksha Dubey | आकांक्षा दुबेचा नवा व्हिडीओ समोर; रडत म्हणाली “मला काही झाल्यास त्याला जबाबदार फक्त..”
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा पुरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. आकांक्षाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. तिने टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र याप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. बुधवारी आकांक्षाचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या 38 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. “मला माहीत नाही मी काय चूक केली? मला या जगात नाही राहायचंय. मी तुम्हा लोकांशी हे शेवटचं बोलतेय”, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. इतकंच नव्हे तर तिला काही झालं तर त्याला कोणती व्यक्ती जबाबदार असेल याचंही नाव तिने या व्हिडीओत घेतलं आहे.
या व्हिडीओमध्ये आकांक्षा पुढे म्हणाली, “मला काहीही झाल्यास त्याला समर सिंह जबाबदार असेल.” समर हा आकांक्षाचा एक्स बॉयफ्रेंड आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याला आणि त्याचा भाऊ संजय सिंहला अटक केली होती. आता हा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या समर आणि संजय यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मात्र आकांक्षाचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आकांक्षाची आई मधू दुबेचे अधिवक्ता शशांक शेखर त्रिपाठी यांनी बुधवारी अभिनेत्रीचा एक फोटो आणि व्हिडीओ सर्वांसमोर आणला. या फोटोमध्ये आकांक्षाचे डोळे सुजलेले पहायला मिळत आहेत. तर व्हिडीओमध्ये ती रडत आपलं दु:ख सांगताना दिसतेय. शशांक यांच्या मते आकांक्षाचा हा व्हिडीओ फार जुना नाही. त्यामुळे न्यायालयात तो सादर करून समर सिंहविरोधात कारवाईची मागणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
वाराणसी: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे का वीडियो आया सामने, वीडियो में आकांक्षा दुबे समर पर आरोप लगाते हुए कहा, “मुझे कुछ भी होता है समर जिम्मेदार होगा, मौत से कुछ दिन पहले आकांक्षा ने लगाया था स्टेट्स, आत्महत्या के मामले में आरोपी समर गिरफ्तार हुआ. #Varanasi @Uppolice pic.twitter.com/IykN286kJQ
— TV9 Uttar Pradesh (@TV9UttarPradesh) April 19, 2023
2019 मध्ये आकांक्षाने भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘मेरी जंग मेरा फैसला’ हा तिचा पहिला चित्रपट होता. आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतल्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि फार कमी वेळात तिला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. लोकप्रियतेसोबतच आकांक्षाने पैसाही कमावला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरुनही पैसे कमवायची. याशिवाय तिचा एक युट्यूब चॅनलसुद्धा आहे.