Akhilesh Yadav | शाहरुख खान याच्या जवान चित्रपटासाठी अखिलेश यादव मैदानात, थेट म्हटले, लोकांमध्ये जागृती आणणारा

शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत दिसतोय. शाहरुख खान हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका करताना देखील दिसत आहे. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल सर्वांमध्येच एक मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.

Akhilesh Yadav | शाहरुख खान याच्या जवान चित्रपटासाठी अखिलेश यादव मैदानात, थेट म्हटले, लोकांमध्ये जागृती आणणारा
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 9:05 PM

मुंबई : शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे जवान या चित्रपटाने आतापर्यंत जगभरातून 384.69 कोटींची कमाई केलीये. शाहरुख खान याचा हा चित्रपट (Movie) मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये जवान चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे.

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. शाहरुख खान याचा जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान हा डंकी चित्रपटाचे शूटिंग कश्मीर येथे करताना दिसला. यावेळीचे काही फोटोही पुढे आले.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. बाॅलिवूडचे अनेक स्टार हे थेट थिएटरमध्येच शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट पाहण्यासाठी पोहचले. प्रत्येकजण जवान चित्रपटासाठी शाहरुख खान याचे काैतुक करताना दिसत आहे. काही वेळापूर्वी महेश भट्ट यांनीही शाहरुख खान याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

आता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही शाहरुख खान याच्या जवान चित्रपटासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टच्या माध्यमातून शाहरुख खान याचे काैतुक करताना अखिलेश यादव दिसत आहे. अखिलेश यादवने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोक यावर कमेंट करत आहेत.

अखिलेश यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मनोरंजनसोबत जबाबदारीचा संदेश देणारा जवान हा चित्रपट खर्‍या अर्थाने देशातील लोकांमध्ये जागृती आणणारा नक्कीच आहे. चित्रपट वेळोवेळी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून आपली उपयुक्तता सिद्ध करून देशाला कसे पुढे नेऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे जवान हा चित्रपट.

दिवसेंदिवस प्रेक्षकांमधील लोकप्रियता वाढव असून सर्व रेकाॅर्ड मोडीत काढत आहे. जवान चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे अभिनंदन करताना देखील अखिलेश यादव दिसत आहेत. आता अखिलेश यादवची ही पोस्ट व्हायरल होत आहे. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाचे काैतुक हे सर्वच स्तरामधून केले जात आहे. शाहरुख खान हा चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.