वाईट रिलेशनशिपमध्ये होती अक्षय कुमारची ‘ही’ अभिनेत्री, लग्नाच्या १९ वर्षांनंतर देखील नाही झाली आई

लग्नाच्या १९ वर्षांनंतर देखील अक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीच्या आयुष्यात नाही मातृत्वाचं सुख..., अभिनेत्री आज जगतेय असं आयुष्य... तिच्या आयुष्यात आले अनेक चढ - उतार

वाईट रिलेशनशिपमध्ये होती अक्षय कुमारची 'ही' अभिनेत्री, लग्नाच्या १९ वर्षांनंतर देखील नाही झाली आई
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 4:10 PM

Ayesha Jhulka Children Story : अभिनेत्री आयशा जुल्का (ayesha jhulka) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. अभिनेत्रीने खिलाडी कुमारसोबत ‘खिलाडी’, ‘बारूद’, ‘वक्त हमारा है’, ‘दिल की बाजी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आयशा ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. तेव्हा प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शकची आयशा हिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. आयशाने अक्षय शिवाय आमिर खान, अजय देवगन यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं. पण काळानुसार अभिनेत्रीची लोकप्रियता कमी झाली. त्यानंतर तिने २००३ मध्ये उद्योजक समीर वाशी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर काही वर्ष अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय होती. पण २००६ नंतर तिने सिनेमात काम करणं बंद केलं.

एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुसाला केला. अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटलं होतं की, मी कधीही लग्न करणार नाही. कारण मी एका वाईट रिलेशनशिपमध्ये होती. आई – वडिलांसोबत संपूर्ण आयुष्य जगण्याचा निर्णय मी घेतला होता. दोघांनी देखील माझ्या निर्णयावर होकार दिला.’ पण अभिनेत्रीच्या आयुष्यात उद्योजक समीर वाशी यांची एन्ट्री झाली. पण लग्नाच्या १९ वर्षांनी देखील अभिनेत्री आई झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

आयशा म्हणाली, ‘मी माझ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. अनेक चढ-उतार पाहिले आहेत. स्वतःच्या मुलांबद्दल असलेला माझा निर्णय जेव्हा मी माझ्या पतीला सांगितला तेव्हा त्यांनी माझा निर्णय मान्य केला. लग्नानंतर मी आणि समीर याने गुजरात येथील दोन गाव दत्तक घेतली आहेत.’ (ayesha jhulka children)

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘गुजरात मधील दोन गावात असलेल्या १६० मुलांचा खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च आम्ही दोघे मिळून करतो. मातृत्वाबद्दल बोलायचं झालं तर, मी १६० मुलांना मुंबईमध्ये आणू शकत नाही. त्यामुळे मी गावी जावून मातृत्वाचा आनंद घेते. स्वतःचं मुल न करण्याचा निर्णय आमच्या दोघांचा होता आणि आज आम्ही आनंदी आहोत.’ असं देखील आयशा म्हणाली. (ayesha jhulka net worth)

आपल्या एका मुलाखतीत आयशा जुल्काने बॉलिवूडपासून दूर जाण्याचे कारण सांगितलं. ‘व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ येते, जेव्हा त्याला आपल्या जीवनाचा नेमका हेतू कळतो. मला आयुष्यात सेटल व्हायचंहो होतं. त्या काळात मला शूटिंगसाठी बर्‍याच शिफ्टमध्ये काम करावे लागत होतं. मी माझं वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकत्रितपणे सांभाळू शकले नाही, यामुळे मी अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.