प्रेम, साखरपुडा त्यानंतर फसवणूक; 19 वर्षांनंतर आमने – सामने येणार अक्षय – रवीना यांची जोडी

Akshay Kumar | ब्रेकअपच्या तब्बल १९ वर्षांनंतर अक्षय - रवीना यांची जोडी येणार आमने - सामने, कारण..., सध्या सर्वत्र अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्या नात्याची चर्चा...

प्रेम, साखरपुडा त्यानंतर फसवणूक; 19 वर्षांनंतर आमने - सामने येणार अक्षय - रवीना यांची जोडी
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 1:18 PM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, रिलेशनशिपमुळे चर्चेत असायचे. पण अनेक सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर सेलिब्रिटींनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नाही. पण अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन ब्रेकअपच्या तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. ९० च्या दशकात दोघांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ब्रेकअपनंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाही. पण अभिनेत्याने वाढदिवसाच्या निमित्त एक मोठी घोषणा केली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षय कुमार याने ‘वेलकम ३’ सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे ‘वेलकम ३’ सिनेमाबाबतची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र ‘वेलकम ३’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात रवीना टंडन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार याने सिनेमाचा एक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोस्टरमध्ये अक्षय आणि रवीना यांच्यासोबत अन्य प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसत आहेत. पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन स्टारर ‘वेलकम ३’ सिनेमा २० डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

रवीना आणि अक्षय यांचं नातं

एक काळ असा होता जेव्हा अक्षय आणि रवीना यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगल्या होत्या. दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. रवीना आणि अक्षय यांचा साखरपुडा देखील झाला होता. पण अक्षय कुमार याने अभिनेत्रीची फसवणूक केल्यामुळे रवीनाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्याने दिली होती नात्याची कबुली..

एका मुलाखतीत खुद्द अक्षय कुमारने रवीना आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला होता. अक्षय म्हणाला होता की, माझं त्या दोघींसोबत अफेअर होतं. अक्षयने प्रेमात फसवल्यानंतर रवीनाने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. तर शिल्पा हिने उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.